43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आरोग्य-नेत्र तपासणी व रक्तदान शिबीर

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आरोग्य-नेत्र तपासणी व रक्तदान शिबीर

0
42

blank

गोंदिया,दि.16 : रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया यांचेमार्फत वाहन चालकांचे आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. सहयोग हॉस्पिटल व जीवनज्योती ब्लड बँक यांच्या सहाय्याने सदरचे शिबीर फूलचूर नाका येथील कार्यालय तसेच शिरपूर देवरी येथील सीमा तपासणी या दोन्ही ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. यावेळी वाहन चालकांचे नेत्र, रक्त-लघवी, ईसीजी यासारख्या आरोग्यविषयक तपासणी करण्यात येऊन संबंधितांना उचित आरोग्य मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून रक्तदान शिबीर देखील आयोजित करण्यात आले होते. 200 हून अधिक नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे राजवर्धन करपे, विजय पाटील, संजीवनी चोपडे, विजय महाजन, गोपाल धुर्वे  तसेच सहयोग हॉस्पिटल व जीवनज्योती ब्लड बँकेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

blank