23.6 C
Gondiā
Wednesday, August 19, 2026
Home विदर्भ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते 60 वर्षावरील वृद्ध व गरजु लोंकाना वॉकर व स्टिक...

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते 60 वर्षावरील वृद्ध व गरजु लोंकाना वॉकर व स्टिक वाटप

0
26

गोंदिया,दि.16ःराष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा व राष्ट्रीय असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रम यांच्या एकत्रित सहकार्याने जिल्हा सामान्य कुवर तिलकसिंह रुग्णालय गोंदिया येथे साठ वर्ष वयोगटातील वृद्ध तसेच गरजु लोंकाना जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांचे हस्ते वॉकर व स्टिक चे वाटप करण्यात आले. त्या वाटप कार्यक्रम प्रसंगी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत तुरकर , निवासी बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी केटीएस सामान्य रुग्णालय गोंदिया डॉ.बी.डी. जयस्वाल यांच्या उपस्थितीत दहा लाभार्थ्यांना वॉकर व तेरा गरजूंना स्टिक मोफत वाटप करण्यात आले. तसेच डायलिसिस सेंटर केटीएस जिल्हा सामान्य गोंदिया येथे गरजूंना एक स्टिक व एक वॉकर वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता कार्यक्रम प्रमुख डॉ.स्नेहा वंजारी (एनसीडी), डॉ. कांचन भोयर भौतिकोपचार तज्ञ, अ‍ॅडवोकेट रेखा कानतोडे (सपाटे), लेखापाल अर्चना शिवनकर, समुपदेशक  भाविका बघेले व  सपना रामटेके, अधिपरिचारिका संध्या शंभरकर व रवीता डोंगरे, आयुष विभाग समुपदेशक सुनंदा रामटेके, सांख्यिकी सहाय्यक निशांत बनसोड , डीएमएचपी दिलीप आगुलवार व मनीष मदने  तसेच कार्यक्रम सहाय्यक सर्व केटीएस सामान्य रुग्णालय गोंदिया इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.