कुरखेडा,दि.18ः- गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या पुराडा वनपरिक्षेत्रात काही इसम वन्यजीवांचे अवयव विक्री करणार असल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, दक्षता विभागाचे विभागीय वनअधिकारी प्रितमसिंग कोडापे यांना मिळाली.त्या माहितीच्या आधारे गडचिरोलीचे वनसरंक्षक डाॅ.किशोर मानकर व वडसा येथीलल उपवनसरंक्षक धनजंय वायभासे यांच्या मार्गदर्शनात 17 जानेवारीला सापळा रचून आऱोपीकंडून बिबटयाचे कातडे व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले. आरोपी विनायक मनीराम टेकाम (वय 39रा.वागदरा),मोरेश्वर वासुदेव बोरकर(वय 45 रा.रामगड),मंगलसिंग शेरकू मडावी (वय 40 रा.वागदरा,)सर्व. ता.कुरखेडा,जि.गडचिरोली यांच्याकडून बिबच्याचे 11 नखे,कातडी जप्त करण्यात आली असून वन्यजीव सरंक्षण कायद्यानुसार अटक करुन वनकोठडी देण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास उपवनसंरक्षक धनजंय वायभासे यांच्या मार्गदर्शनात कुरखेड्याचे उपविभागीय वन अधिकारी मनोज चव्हाण,पुराडाचे वनपरिक्षेत्राधिकारी बालाजी डिगोळे,क्षेत्रसहाय्यक रामगडचे संजय कंकलवार करीत आहेत. ही कारवाई उपविभागीय वनअधिकारी मनोज चव्हाण, वनपरिक्षेत्राधिकारी बालाजी डिगोळे,संजय कंकलवार,रामचंद ढवळे,भरत रामपुरकर,अमर कन्नाके,शामराव कुळमेथे,सुरेश रामटेके,सुनंदा मडावी,गंगाधर मेने,हाडकिकन्हार, गंगाधर नन्नावरे आदींनी केली.