37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News चकमकीत दोन नक्षलवादी ठार

चकमकीत दोन नक्षलवादी ठार

0
26

गडचिरोली, दि.२०: जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कसनसूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सेवारी गावानजीकच्या जंगलात आज दुपारी झालेल्या चकमकीत दोन नक्षल्यांना सी 60 च्या पथकाने ठार केल्याची माहीती समोर आली आहे.

कसनसूर परिसरातील जंगलात आज विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना दुपारी चार वाजताच्या सुमारास त्यांची नक्षल्यांशी चकमक झाली. चकमकीत पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पसार झाले. परंतु दोन नक्षल्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. शिवाय दोन ३०३ रायफली व अन्य नक्षल साहित्यही पोलिसांच्या हाती लागले आहे. वृत्त लिहिपर्यंत मृत नक्षल्यांची ओळख पटली नव्हती. रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या सकाळी नक्षल्यांचे मृतदेह गडचिरोलीला आणण्यात येतील, अशी माहिती पोलिसांनी दिली..

blank