कचारगडच्या विकासाकरीता सरकार कटीबध्द-मंत्री गावीत

0
15

सालेकसा,दि.4- , आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा सालेकसा तालुक्यातील धनेगाव कचारगड ही सुप्रसिद्ध म्हणून एक ओळख आहे.याठिकाणी 3 फेबुवारीपासून कचारगड यात्रेला सुरवात झाली असून आज कचारगड यात्रेच्या दुसरा दिवस असून राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी कचारगड यात्रेला भेट देत संबोधित केले. विशेष म्हणजे दोन वर्षात कोरोना काळात ही जत्रा लागू शकली नाही.परंतु कोरोनानंतर पुन्हा त्याच जोमाने मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनाकरिता पोचले आहेत.आपल्या भाषणात गावीत यांनी सांगितलं की कचारगडच्या विकासाकरीता मोठ्या प्रमाणावर निधी दिला जाईल आणि या निधीच्या कुठलाही दुरुपयोग करता कामा नये.तसेच कचारगडच्या विकासाकरिता आपण नेहमी कट्टीबध्द असल्याचे म्हणाले. यावेळी खासदार अशोक नेते,गडचिरोलीचे आमदार देवराव होळी, डॉ.नामदेव कीरसान,राजकुमार पुराम,पंचायत समिती सदस्य अर्चना मडावी,माजी आमदार संजय पुराम यांच्यासह इतर नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.