शिव जयंती निमित्त जीएमसीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर

0
40

रविवार १९ फेब्रुवारीला आयोजन

सहभागी होण्याचे आवाहन

       गोंदिया, दि.१८ : भारतीय स्वांतत्र्यास ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या संकल्पणेतून महाराष्ट्र राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त १९ फेब्रुवारी २०२३ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया तर्फे शासकीय रक्त केंद बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय गोंदिया येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

          सदर रक्तदान शिबिरामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील सर्व अधिकारी, कर्मचारी, परिचारीका कर्मचारी, निवासी डॉक्टर्स तसेच विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सदर रक्तदान शिबिर हे शासकीय रक्त केंद्र बाई गंगाबाई स्त्री रुग्णाल तसेच सडक अर्जुनी येथे आयोजित करण्यात आल्याचे संस्थेचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी सांगितले.

         जिल्ह्यातील सामाजिक कार्य करणाऱ्या समाजसेवा संघटना, सहकारी संस्था तसेच स्वयंसेवी रक्तदाता यांनी भव्य रक्तदान शिबीरात रक्तदान करुन सहभागी होण्यासाठी आवाहन केले. तसेच रक्तदानाचा हा कार्यक्रम शासकीय रक्त केंद बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय गोंदिया येथे पुर्ण वर्षभर चालविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सदर कार्यक्रमास उत्सफुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. नंदकिशोर जयस्वाल, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. पल्लवी गेडाम, उप वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजयकुमार माहुले, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा पटेरीया यांनी केले.