37.8 C
Gondiā
Friday, June 19, 2026
Home विदर्भ प्रतापगड यात्रेत एका महिला भाविकेचा मृत्यू

प्रतापगड यात्रेत एका महिला भाविकेचा मृत्यू

0
73

नवेगावबांध दि.१८.प्रतापगड यात्रेत नवेगावबांध येथील प्रभा कुंभरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुखद घटना यात्रेत घडली.
नवेगावबांध येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नीलकंठ कुंभरे यांच्या पत्नी प्रभाबाई वय ५५ वर्षे यांचे आज प्रतापगड यात्रेत दुःखद निधन झाले. त्यांच्यावर उद्या रविवार 19 फेबुवारीला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्या ग्रामपंचायत सदस्य विजय कुंभरे यांच्या मातोश्री आहेत. यात्रेदरम्यान एखाद्या भाविकांचा मृत्यू व्हावा,ही प्रतापगड यात्रेतील पहिलीच घटना आहे,असे सांगितले जाते. मृतक प्रभा ह्या प्रतापगड यात्रेत आल्या होत्या.प्रतापगड यात्रेत सहभागी झाल्या.त्या वर गडावर चढत होत्या. वाटेत त्यांच्या लहान मुलाच्या दुकानात विश्रांती घेतली. पुढे प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या प्राचीन शिव मंदिरात श्री भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी जाण्यासाठी त्या उभ्या राहिल्या बरोबर त्यांना भोवळ येऊन बेशुध्द पडल्या असता त्यांचा तिथेच मृत्यू झाला.