मोहाडी येथील श्रीराम मंदिर देवस्थानात शिवमंदिराचे लोकार्पण

0
25

गोरेगाव,दि.१८ः तालुक्यातील मोहाडी येतील प्राचीन श्रीराम मंदिर देवस्थान येथे आज १८ फेबुवारीली लोकवर्गणीतून नवीन बांधकाम करण्यात आलेल्या शिवमंदीरात शिवलिंग, प्राणप्रतिष्ठा पुजा आरती करुन मंदीराचे लोकार्पण करण्यात आले.कार्यक्रमांचे अध्यक्ष सेवानिवृत्त सहा.उपवनसंरक्षक यु.टी.बिसेन होते.तर उदघाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्य डॉ.लक्ष्मण भगत व दिपप्रज्वलन गोरेगाव पंचायत समितीचे सभापती मनोज बोपचे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य रामेश्र्वर माहरवाडे,माजी जिल्हा परिषद सदस्य जगदिश येरोला,मोहाडीचे सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे,माजी पंचायत समिती सदस्य डुमेश्वर चौरागडे, उपसरपंच मोहनलाल पटले,जेसीबी फिल्ड मॅनेजर हरेंन्द्र कावडे,माजी सरपंच मदनलाल बघेले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक ग्रंथमित्र वाय.डी.चौरागडे,माजी सैनिक कुवरलाल चौधरी,सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे.जे. पटले,देवस्थानचे अध्यक्ष श्रीराम पारधी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ लक्ष्मण भगत यांनी 15 व्या वित्त आयोग जिल्हा परिषदस्तर मधून शिंवमंदीराकरिता तीन लक्ष रूपयाचे सभामंडप बांधकामाचे आश्वासन दिले.सभापती मनोज बोपचे यांनी सुध्दा देवस्थानात गटु बांधकाम करण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्राम पंचायत सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे यांनी केले तर संचालन सेवानिवृत्त शिक्षक वाय.एफ.पटले  यांनी केेले.आभार देवस्थानचे अध्यक्ष श्रीराम पारधी यांनी मानले.कार्यक्रमात सामाजिक संगठन स्वाभिमान बचत फाऊंडेशनकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.