33.9 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News नक्षल्यांनी केली दोघांची हत्या

नक्षल्यांनी केली दोघांची हत्या

0
25

कोरची, -: उद्यापासून सुरु होणाऱ्या पोलिस भरतीच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांनी काल रात्री दोन जणांची हत्या केल्याची घटना कोटगूल पोलिस मदत केंद्रांतर्गत घडली. पंचम कोरेटी रा.सोनपूर व सूर्यभान टेंभुर्णे रा.वाको अशी मृतांची नावे आहेत.

काल सशस्त्र नक्षलवादी पंचम कोरेटी यांच्या घरी गेले. त्यांनी कोरेटी यांना झोपेतून उठवून गावाबाहेर नेले. त्यानंतर त्याची हत्या केली. आज पिटेसूर रस्त्यावर कोरेटी यांचा मृतदेह आढळून आला. पंचम कोरेटी हे सोनपूरचे माजी पोलिस पाटील आहेत. दुसऱ्या घटनेत वाको येथील सूर्यभान टेंभूर्णे यांचा खून करण्यात आला. घरापासून शंभर मीटर अंतरावरच त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळयात आढळून आला. मात्र टेंभूर्णे यांची हत्या नक्षल्यांनी केली की अन्य कुणी, हे स्पष्ट झाले नाही. दुपारपर्यंत पोलिस घटनास्थळी पोहचले नव्हते.

blank