भद्रावतीत पाच किलो गांजा जप्त

0
14

भद्रावती-शहरातील मुख्य मार्गावरील पेट्रोल पंपजवळ गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या चार आरोपीसह पाच किलो गांजा जप्त करण्यात आला. यातील मुद्देमालासह १ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई रात्री ८.00 वाजता दरम्यान करण्यात आली.
सौरभ दुर्वास कसारे, (२२), अदनान जाकीर शेख (२१), लोकेश दौलत मानकर (२२), राहुल दिलीप साखरे (२१) सर्व राहणार चंद्रपूर अशी आरोपींची नावे आहेत. चंद्रपूर हून भद्रावती येत असताना चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील पेट्रोल पंप जवळ गांजाची विक्री करण्यासाठी येत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली.
त्याआधारे ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक सुधीर वर्मा, शशांक बद्दामवार, जगदीश झाडे, रोहित चिटगिरे, आशिष गौरकर, मोनाली गारगाटे यांनी सापडा रचून ही कारवाई केली.
आरोपीकडून पाच किलो गांजासह दोन मोटरसायकल, मोबाईल असा १ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यातील चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील कारवाई भद्रावती पोलिस करीत आहे.