“नवनीत राणांच्‍या दोन जन्‍मतारखा”; ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

0
14

अमरावती : खासदार नवनीत राणा यांच्या दोन जन्मतारखा असून त्यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढविल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी केला आहे. येत्या ६ एप्रिलला हनुमान जयंती असून खासदार नवनीत राणा यांच्या एका शाळा सोडल्याच्या दाखल्यावर (टीसी) त्यानंतरची जन्मातारीख ६ एप्रिल १९८५ अशी आहे, तर त्यांच्या जातीचा उल्लेख शीख असा आहे.हनुमान जयंती आणि आपला वाढदिवस एकाच दिवशी आला असल्याचे त्या आनंदाने सांगत आहेत. दुसरीकडे, त्यांच्या जातीच्या  खोट्या प्रमाणपत्रासाठी जोडण्यात आलेल्यात ‘टीसी’वर त्यां ची जन्मतारीख १५ एप्रिल १९८५ अशी आहे. त्यांच्याा जात प्रमाणपत्रावर ‘मोची’ असा त्यांच्या जातीचा उल्लेख आहे. त्यामुळे त्यांची खरी जन्मतारीख कोणती आणि खरे जात प्रमाणपत्र कोणते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याविषयी त्यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी सुनील खराटे यांनी केली आहे.शहरातील मुस्लिमांच्या  अनेक उत्सावांमध्ये राणा दाम्पत्य सहभागी झाले आहेत. मुस्लिमांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांचा पेहराव घालण्याची नौटंकी राणा दाम्पत्यच करू शकतात, अशी टीका सुनील खराटे यांनी केली. स्वार्थासाठी सतत नौटंकी करणाऱ्या नवनीत राणा या हिंदू शेरणी कशा, असा सवाल खराटे यांनी उपस्थित केला आहे. हनुमान जयंतीच्या पर्वावर त्या मोठा उत्सव साजरा करीत आहेत, ही चांगली बाब आहे, पण हनुमान चालिसेच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये आमच्या  नेत्यांबाबत चुकीचा उल्लेख करणे, हा हिंदुत्वावाद नाही, असे सुनील खराटे यांनी सांगितले.