33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Featured News १४ एप्रिलला गडचिरोलीत एल.के.मडावी यांचे व्याख्यान

१४ एप्रिलला गडचिरोलीत एल.के.मडावी यांचे व्याख्यान

0
18

blank

गडचिरोली, -डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त गडचिरोली येथे सुप्रसिद्ध साहित्यिक ‘पताना’कार एल.के.मडावी यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता समिती व विशाखा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम १४ एप्रिलला सकाळी ९ वाजता गोकुळनगरातील सम्यक बुद्ध विहारात होणार आहे. गडचिरोलीचे सहायक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, नागपुरातील विचारवंत अॅड.संदीप नंदेश्वर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. समता समितीचे अध्यक्ष रोहिदास राऊत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील.

blank