चंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात उन्हाच्या तीव्रतेने वाघ जंगलाबाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी पर्यटकांच्या गर्दीत वाघ मोहरली मुख्य रस्त्यावर सायंकाळी दिसून आला. वाघ रस्त्यावर असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक काही वेळासाठी थांबली होती.
रविवारी सुटीच्या दिवशी सकाळी व दुपारच्या सफारीत पर्यटक ताडोबात गर्दी करून होते. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पर्यटक मोहरली मुख्य रस्त्याने जात असताना या मार्गावर एक पूर्ण वाढ झालेल्या पट्टेदार वाघाने पर्यटकांना दर्शन दिले. हा वाघ रस्ता पार करून जंगलात निघून गेला. वाघ रस्ता पार करीत असताना दोन्ही बाजूला वाहनांची गर्दी झाली होती. वाघ रस्ता पार करून जंगलात जात नाही तोवर पर्यटक रस्त्यावर होते. जंगलात वाघ गेल्यानंतर बराच वेळ पर्यटकांना दर्शन देत होता.





