28.8 C
Gondiā
Wednesday, August 26, 2026
Home विदर्भ इसापूर येथे बंद गटर बांधकामाचे भूमिपूजन

इसापूर येथे बंद गटर बांधकामाचे भूमिपूजन

0
26

अर्जुनी मोर,दि.25ः- तालुक्यातील इसापूर येथे 15 व्या वित्त आयोग जिल्हा परिषदस्तरीय निधीतून मंजूर बंद गटर बांधकामाचे भूमिपूजन 24 एप्रिल रोजी जिल्हा परिषद सदस्या पौर्णिमा उमाकांत ढेंगे यांच्या हस्ते करण्यात आले. या भूमिपूजन कार्यक्रम अध्यक्षस्थानी ईसापुर ग्रामपंचायतचे सरपंच कल्पना करंबे तर सह उद्घाटक म्हणून माजी सभापती  उमाकांत ढेंगे होते.प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य आनंदराव सोनवणे,दीक्षा लांजेवार,नलिनी चांदेवार,माजी सरपंच लोचन चांदेवार,माजी उपसरपंच गजानन चांदेवार,ग्रामसेवक समीर रामटेके,पत्रकार संतोष रोकडे,माजी उपसरपंच राजेंद्र लांजेवार व इतर मान्यवर उपस्थित होते.