28.2 C
Gondiā
Wednesday, August 26, 2026
Home Uncategorized तांदूळ चोरी करणाऱ्या चौघांना अटक, 11 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

तांदूळ चोरी करणाऱ्या चौघांना अटक, 11 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

0
51

-गोंदिया ग्रामीण पोलीसांची उत्कृष्ट कामगीरी

गोंदिया,दि.25ः- गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणेतंर्गत येत असलेल्या ढिमरटोली परिसरातून एका छोट्या चारचाकी वाहनातून तांदळाची चोरी करुन नेले जात असल्याची गुप्त माहिती पोलीस निरिक्षक सचिन म्हेत्रे यांना 23 एप्रिलच्या रात्री 11 वाजेच्या सुमारास मिळाली.त्या माहितीच्या आधारे ठाणेदार म्हेत्रे यांनी गस्तीवरील पथकाला माहिती देत गोंदिया गोरेगाव मार्गावरील फुडलॅंड हाॅटेलजवळ नाकाबंदी केली असता छोटा हाथी टिप्पर वाहन क्र.MH -35 AJ-1071 हे गोरेगावच्या दिशेने येत असल्याचे दिसून आले.वाहनाला थांबवून चौकशी करण्यात आली असता त्या वाहनामध्ये चोरी केलेला तांदुळ नेत असल्याचे स्पष्ट झाल्याने वाहनासह 11 लाख 85 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन चौघांना अटक करण्यात आली.

त्याचप्रमाणे वरिष्ठांचे निर्देशाप्रमाणे पो. नि. म्हेत्रे यांनी स्वतः कारवाईस रवाना होवून पो. ठाणे गोंदिया ग्रामीण रात्र गस्ती वरील पो. स्टाफ ला शासकिय वाहनासह किंजल राईस मील जवळ धिमरटोली येथे पोहचण्या च्या सूचना दिल्या. प्राप्त खात्रीशिर माहिती प्रमाणे पो. स्टाफ सह फुडलैंड हॉटेल, धिमर टोली येथे नाकाबंदी केली असता रात्री 00.35 वाजता चे सुमारास वरील नमूद क्रमाकांचे वाहन गोंदिया कडुन गोरेगांव कडे येताना दिसल्याने सदर वाहनास पोलीस स्टाफ चे मदतीने थांबविण्यात आले.माहिती नुसार खात्री करून वाहना ची पाहणी केली असता सदर वाहनाचे मागे डाल्या मध्ये मालावर 09 व कॅबीन मध्ये 02 असे एकूण 11 इसम बसल्याचे दिसुन आले. सदर वाहन क्र.MH- 35 AJ- 1071 चा चालक नामे- सुधीर हंसराज शहारे वय 35 वर्ष रा. मुंडीपार यास छोटा हाथी (टिप्पर) मध्ये भरले ल्या मालाबाबत विचारणा केली असता त्याने टिप्पर च्या डाल्यामध्ये तांदुळ असल्याचे सांगुन कॅबीन मधील बसलेला इसम नामे धर्मेन्द्र मारवदे रा. धीमरटो ली चे मदतीने चोरुन मुंडीपार येथे घेवुन जात असल्याचे सांगीतले.

केबीन मधील इसमास त्याचे नाव विचारले असता त्याने मनीष महेन्द्र शेंडे वय 30 रा. कु-हाडी असे सांगुन टिप्परचे मागे मालावर बसलेले लोक हमाल असल्याचे सांगुन बम्लेश्वरी गोडाऊन, मील टोली येथील संजय डोमळे व धर्मेन्द्र मारबदे यांचे मदतीने गोडाऊन मधील प्रत्येकी 50 किलो वजनाचे अंदाजे 185 कट्टे तांदुळ चोरल्याचे सांगितल्याने टिप्परमध्ये भरलेल्या माला ची तपासणी केली असता प्रत्येक कट्यावर लावले ल्या लेबलवरील डि.सि. पि.एस. स्किम, डि.एम.ओ गोंदिया लॉट नं. 18 जय बम्लेश्वरी राईस मिल, फुलचुर, गोंदिया महाराष्ट्र शासन ईत्यादी मजकुरा वरून सदर तांदुळ हा शासकिय योजनेचा असल्याचे दिसुन आले.

सदर टिप्पर मधील तांदुळ हा चोरीचा असल्या चे स्पष्ट झाल्याने पो. नि. म्हेत्रे यांनी टिप्पर मधील तांदळा चे प्रत्येकी 50 किलो वजनाचे 185 कट्टे किंमती अंदाजे 1,85,00 0/- रुपये तसेच छोटा हाथी टिप्पर क्र. MH-35 AJ-1071 किंमती अंदाजे 10 लाख रुपये असा एकूण 11 लाख 85, हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

बम्लेश्वरी गोडाऊन ढिमरटोली येथुन शासकिय तांदूळ चोरी प्रक्ररणी आरोपी मनीष महेन्द्र शेंडे वय 30 वर्ष रा. कु-हाडी,सुधीर बेसराज शहारे वय 35 वर्षे रा.मुंडीपार, संजय डोमळे रा. मिलटोली, धर्मेन्द्र मारबदे रा. धिमरटोली यांचे विरूद्ध पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण येथे गुन्हा रजी नोंद क्रं. 161/ 2023 कलम 380, 381, 34 भादंवि.अन्वये दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात वर नमूद 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्या चे अनुषंगाने अधिकचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात पो. नि. म्हेत्रे, गोंदिया ग्रामीण हे करित आहेत.

सदरची कामगीरी निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक, गोंदिया, अशोक बनकर, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया यांचे निर्देश सूचना प्रमाणे सुनील ताजने, उपवि भागीय पोलीस, अधिकारी गोंदिया यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक  सचिन म्हेत्रे, यांचे नेतृत्वात परी. पोउपनि. रवी कवडे, पोहवा. कोकोडे, सैनिक सनद क्र.76, 209, 311, यांनी अथक परिश्रम घेवून कामगिरी केलेली आहे.वरिष्ठांनी गोंदिया ग्रामीण पोलीसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी चे कौतुक आणि अभिनंदन केले आहे.