28.2 C
Gondiā
Wednesday, August 26, 2026
Home विदर्भ सुशील अंबादे पेंशन प्रकरणावर कार्यवाही करा- प्रकल्प अधिकारी

सुशील अंबादे पेंशन प्रकरणावर कार्यवाही करा- प्रकल्प अधिकारी

0
26

देवरीचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार याचे निर्देश

 देवरी,दि.२५ – देवरीचे एकात्मिक आधिवासी विकास प्रकल्प अधिकारी आणि विदर्भ अनुदानित आदिवासी आश्रमशाळा शिक्षणक-शि्क्षकेत्तर कर्मचारी संघाची  बेठक काल सोमवारी देवरीच्या प्रकल्प कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.

यै बैठकीत सुशील अंबादे यांच्या पत्नी श्रीमती शुभांगी यांना दि.३१ मार्च २०२३ अन्वये पेंशन प्रकरण महालेखाकार यांना पाठविण्यात यावे, शिक्षक कर्मचारी यांना सेवापुस्तिकेची दुय्यम प्रत, शिक्षकांना रात्रपाळी ऐवजी अभ्यास ड्युटी, भविष्य निर्वाह निधी मधील उचल करताना शिक्षक-कर्मचारी यांना होणारा आर्थिक त्रास, श्रीमती रोहीणी गट्टे, समर्थ आश्रम शाळा केशोरी यांना होणारा मानसिक त्रास, वारंवार केली जाणारी वेतनकपात, प्रकल्पातील सर्व शाळेत बायमँट्रीक लावणे, बंद बायमँट्रीक सुरू करणे असे निर्देश विकिस राचेलवार यांनी दिले. शिक्षकेत्तर कर्मचारी स्वयंपाकी यांना नियमानुसार दीर्धसुटयांच्या कालावधीत रजा दिल्या जात नाही, याबाबत कार्यवाही करणे, विदयार्थी प्रवेश लक्ष पूर्ण न करण्याच्या नावावर थांबविलेल्या वेतनवाढ मोकळ्या करणे, मार्च व एप्रिलचे वेतन एकत्रित काढणे आदी विषयावर सांगोपांग चर्चा करण्यात आली. यावेळी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार , सहायक प्रकल्प अधिकारी शिरिष सोनोने, लेखा अधिकारी गणेश  कोरे, लिपिक सरिता मोहनकर, अरविंद कोडापे,ओमेश्वरी फुंडे संघटनेचे अध्यक्ष तेजराज राजुकर,सचिव हेमंत कोचे,प्रमोद रेवतकर,सचिन मांडवकर,रोहीणी गट्टे आदी अधिकारी-पदाधिकारी उपस्थित होते