23.8 C
Gondiā
Wednesday, August 26, 2026
Home विदर्भ देवरी येथे परशुराम जयंती उत्साहात साजरी

देवरी येथे परशुराम जयंती उत्साहात साजरी

0
39

देवरी, ता.२३: श्री. परशुराम यांचा जन्मोत्सव सर्वभाषी ब्राह्मण महासभा देवरी तालुक्याच्या वतीने गेल्या शनिवारी (दि.२२) रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दरम्यान, मनीष शर्मा यांच्या शितला माता रामायण भजन मंडळ आमगावच्या वतीने भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
देवरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोरगावचे सेवानिवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षक उमाशंकर शर्मा होते. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आमगावचे प्राध्यापक विनायक अंजनकर व देवरीचे सामाजिक कार्यकर्ता एस डी तिवारी हे उपस्थित होते. यावेळी ब्राम्हण महासभेचे तालुकाध्यक्ष दीपक शर्मा, उपाध्यक्ष वीरेंद्र अंजनकर, सचिव संजय भागवतकर, कोषाध्यक्ष गोपाल तिवारी, प्रवक्ता लल्लन तिवारी, युवाध्यक्ष निखिल शर्मा, महिला अध्यक्ष मीनाक्षी शर्मा, माजी सचिव नंदूप्रसाद शर्मा, मधू पालिवाल, सुरेश(पप्पू) शर्मा, महिला कार्यकर्ते वनिता राजनकर, विमला जोशी,कमलेश पांडे, सौरभ शर्मा,आमगावच्या शितला माता रामायण भजन मंडळाचे मनीष शर्मा व त्याची चमू यांच्या सह ब्राम्हण समाजातील महिला, पुरुष व युवावर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.
सर्वप्रथम श्री परशूराम यांच्या प्रतिमेची प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पुजा अर्चना करण्यात आली. दरम्यान १० वीच्या बोर्ड परीक्षेत प्राविण्य मिळविणारे समाजाचे एकांशू नंदूप्रसाद शर्मा व वैभवी संजय भागवतकर यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आले.
या प्रसंगी प्रा. विनायक अंजनकर व श्री तिवारी यांनी समाजाला भगवान परशूराम यांच्या जीवनाविषयी मार्गदर्शन करून समाजाच्या सर्वांगिन विकासाकरिता एकनिष्ठेने कशा प्रकारे कार्य करून समाजाला पुढे नेण्याचे काम करता येईल याविषयी  मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक शर्मा यांनी तर संचालन गोपाल तिवारी यांनी आणि उपस्थितांचे आभार लल्लन तिवारी यांनी मानले.