24.5 C
Gondiā
Wednesday, August 26, 2026
Home गुन्हेवार्ता दुकानदाराची फसवणूक करणा-या दोन उच्च शिक्षीत आरोपींना 24 तासात अटक

दुकानदाराची फसवणूक करणा-या दोन उच्च शिक्षीत आरोपींना 24 तासात अटक

0
35

शहर पोलीसांची कामगिरी, फसवणुक केलेला किंमती 69,200/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

गोंदिया,दुकानदाराची फसवणूक करणा-या दोन उच्च शिक्षीत आरोपींना गोंदिया शहर पोलिसांनी 24 तासात अटक करुन गजाआड केले.सदर आरोपी हे छत्तीसगड राज्यातील रहिवासी असलेल्या या युवकांनी ऑनलाईन पेमेंटच्या नावावर फसवणूक केल्याची घटना 23. 04. 23 रोजी चे 16.00 वा. ते 19. 30 वा. चे दरम्यान घडली़.

फिर्यादी. नितीनकुमार बलदेव प्रसाद अग्रवाल रा. गंज वार्ड, गोंदिया यांचे किराणा दुकानात दोन अनोळखी इसमांनी खादय तेलाचे 5 टिन किंमती 9225/- रू चे खरेदी करुन दुकानात लावलेले *क्यू आर कोड* ची फोटो काढले व त्यावर पैसे ट्रान्सफर होत नाही असे फिर्यादीस सांगुन फिर्यादीचे मोबाईल वर वडीलाकडुन पैसे पाठवत आहोत असे सांगुन फिर्यादीचे मोबाईल वर 10,000/- रु जमा झाल्याचे संदेश पाठवले. त्यावरुन फिर्यादीने अधिक चे 775/- रु नगद आरोपी तांना परत केले. फिर्यादीचे खात्यावर पैसे न पाठवता फिर्यादीची फसवणुक केली. त्याबाबत त्यांनी त्याचे सहकारी व दुकान दार मित्र यांचे व्हाटसअप ग्रुपवर संदेश प्रसारीत केले असता याच दोनअनोळखी इसमानी इतर व्यापा-यांची सुध्दा अश्याचप्रकारे फसव णुक केल्याचे समजले. या वरुन फिर्यादी यांचे तक्रार वरुन पो. ठाणे गोंदिया शहर येथे अपराध क्रमांक 276/ 2022 कलम 420, 34 भा. दं. वि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

वरिष्ठांचे निर्देशांन्वये व मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाच्या तपासा दरम्यान पोलीस ठाणें गोंदिया शहर गुन्हे प्रकटीकरण पथका तील अमलदारांनी सी.सी टी.व्ही. फुटेज तसेच इतर तांत्रीक महिती व गोपणीय सुत्राचे आधारावरून अनो ळखी आरोपीतांचा शोध घेवून आरोपी प्रतीक मधुसुदन आचारी वय 22 वर्षे, रा. भिलाई,जि-दुर्ग (छ.ग.),रोहीतकुमार शरद शाहु वय 21 वर्षे, रा. भिलाई, दुर्ग (छ.ग.) यांना ताब्यात घेवुन गुन्ह्यात अटक करण्यात आले.

वरील नमूद आरोपी यांचेकडुन प्रस्तुत गुन्हयात ला फिर्यादी व साक्षीदार तसेच इतरांची फसवणुक करुन घेवुन गेलेले खादय तेलाचे 34 नग टिन एकुण किंमती 64200/- व नगद 5000/- रु *असा एकुण 69200/- रु चा माल हस्तगत करून जप्त करण्यात आलेला आहे* दोन्हीं आरोपी यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. तपासामध्ये अटक आरोपीतांनी मिळुन साक्षीदारा शिवाय इतर अनेक व्यवसायिकांची देखील फसवणुक केली असल्याचे समोर येत आहे. सदर संबंधाने सविस्तर सखोल गुन्ह्याचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात करण्यात येत आहे. सदर गुन्हाचा तपास पोहवा- सतिश शेंडे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी . निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक गोंदिया, श्अशोक बनकर, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया,. सुनिल ताजने, उपवि भागीय पोलीस अधिकारी, गोंदिया उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. गोंदिया शहरचे पो. नि. चंन्द्रकांत सुर्यवंशी,सपोनि. सागर पाटील, पो. हवा. सुदेश टेंभरे, पो. हवा. जागेश्वर उईके, पो. हवा. प्रमोद चव्हाण, पो.हवा. सतिश शेन्डे, पो. हवा. ओमेश्वर मेश्राम, पो. हवा. दिपक राहांगडाले, पो.शि. मुकेश रावते, पो.शि. कुणाल बारेवार, पोशि पुरूषोत्तम देशमुख, पोशि सुभाष सोनवाणे यांनी केलेली आहे.