सरपंच पपीता नंदेश्वर यांचे प्रतिपादन
अर्जुनी /मोर ता.25:-विज्ञानाच्या साहाय्याने आपला देश मोठी प्रगती साधत आहे, हे निरंतर सुरु ठेवण्यासाठी आतापासूनच छोट्या बालकांची काळजी घेणे आवश्यक असून त्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धीक आणि भावनिक विकासासाठी पालक मेळाव्यांचे आयोजन आवश्यक आहे असा विश्वास पवनी /धाबेच्या सरपंच श्रीमती पपीता नंदेश्वर यांनी व्यक्त केला.
श्रीमती नंदेश्वर ह्या पवनी /धाबे येथे आयोजित पालक मेळाव्यात अध्यक्ष पदावरून बोलत होत्या.
मंचावार महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रियंका किरणापुरे, मुख्याध्यापक रमेश गायकवाड, ग्रामसेवक पृथ्वीराज कोल्हटकर,ग्रामपंचायत सदस्य दीपिका चुटे, सुनंदा कवडो उपस्थित होते.
दरम्यान मंचावर उपस्थित मान्यवरांनी समायोजित विचार मांडले.
यावेळी अंगणवाडी सेविकानी शून्य ते 3 वर्ष आणि त्यानंतरच्या बालकांचा बौद्धिक विकासाला साजेस्या माहितीचे प्रदर्शन घडविण्यासाठी मोठे स्टॉल्स लावले होते.यामध्ये, मेंदूचा विकास व मेंदूचे जाळे, साप सीडी, बाजारातील जन्क फूड न खाने, मुलांसाठी स्वयंपाक खोलीतील साहित्याची माहिती,
भविष्याचे झाड, झुंबर, घरगुती भांडे, खूळखुळे, फळांची आणि भाजीपाल्याची माहितीचे फलक,भौतिक वातावरण, आदिची मुद्देसूद माहिती पालकांना देण्यात आली.यावेळी मेंदूचे जाळे आणि सापसीडी या विश्लेस्नात्मक कार्यक्रमाची खूप प्रशंसा करण्यात आली.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प आणि पवनी /धाबे बिटच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या छायाचित्रांना माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. किरणापुरे यांनी केले , संचालन अंगणवाडी पर्यवेक्षिका वीणा वैद्य यांनी तर आभार अंगणवाडी सेविका अंकिता इसकापे यांनी मानले.या कार्यक्रमाचा लाभ पालकांनी घेतला.





