41.6 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ गोंदिया जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (IFAD) मिशनची भेट

गोंदिया जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (IFAD) मिशनची भेट

0
39
????????????????????????????????????

blank

 गोंदिया,दि.29 : गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्राच्या अति पुर्वेकडील जिल्हा असून आदिवासी व अति-दुर्गम म्हणूनही अशी ओळख आहे. 27 एप्रिल 2023 ला आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी मिशनचे आगमन गोंदिया येथे झाले त्यावेळी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर यांचे हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

        27 एप्रिल 2023 ला सकाळी 9.45 वा सालेकसा तालुक्यात IFAD मिशन टीमचे गोंदिया जिल्ह्यातील सहारा लोकसंचालीत साधन केंद्र अंतर्गत सुरु असलेल्या नव- तेजस्विनी  महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाचे काम बघण्याचे नियोजन करण्यात आले होते. नियोजनानुसार IFAD टीमचे श्रीमती एलिझाबेथ सेंडीवाला (पीआयएल/मॅनस्ट्रीमिंग थीम), श्रीराम सिंग (पशुधन उत्पादन व विपणन तज्ञ), विनय तुली (व्हॅल्यूचेन एंटरप्राइझ, मार्केट स्पेशालिस्ट), विरेंद्र गर्ग (खरेदी विशेषज्ञ), महेंद्र गमरे (प्रशासकिय व्यवस्थापक) माविम मुख्यालय मुंबई,  गौरी दोंदे (कार्यक्रम व्यवस्थापक), महेश कोकरे (उपव्यवस्थापक) माविम मुख्यालय मुंबई, राजू इंगळे विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी नागपूर विभाग आदी मान्यवर टीमचे स्वागत सहारा लोक संचालित साधन केंद्र सालेकसा, कार्यकारिणी यांनी केले. गोंदिया जिल्ह्याचे माहितीपर प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर यांनी केले.

         सालेकसा येथे कृषी सेवा केंद्र, निंबा येथे शेळीपालन व कुक्कुटपालन या सर्व  प्रोजेक्टची पाहणी करून कार्यकारणी यांची सभा घेण्यात आली. तसेच आमगाव येथे माविम मित्रमंडळ (स्त्री-पुरुष) समानता याबाबत सभा घेण्यात आली. यावेळी प्रकल्पाचा सहभाग सकस आहार (न्युट्रीगार्डन) महिला आरोग्यावर भर देऊन कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

         आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (IFAD) सहाय्यित “नव तेजस्विनी- महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प” सन २०20-2१ ते सन २०२5-२6 या सहा वर्षाच्या कालावधीमध्ये महिला व बाल विकास विभागाच्या वतीने महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत (माविम) राबविण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

          महिला व बाल विकास विभागाच्या संदर्भाधीन क्र.२ येथील दि.८.१.२०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (IFAD) सहाय्यित “नव  तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प राबविण्यासाठी “आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (IFAD) कडून घेण्यात येणारे दिर्घ मुदतीचे कर्ज १.२५% व्याज दर व ०.७५% सेवा शुल्क, कर्जाच्या परत फेडीसाठी ५ वर्ष अधिस्थगन कालावधी (Moratorium Period) आणि कर्जाची परतफेड ही कार्यक्रम पुर्ण झाल्यानंतर ५ वर्षानंतर सुरु होवून २० वर्षापर्यंत करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.

            सदर मिशनच्या यशस्वीतेकरिता माविम जिल्हा कार्यालय गोंदिया येथील अधिकारी व कर्मचारी तसेच लोक संचालित साधन केंद्र सालेकसा, आमगाव, गोरेगाव व गोंदिया यांनी परिश्रम घेतले.

blank