गोंदिया,दि.29ः- तालुक्यातील रावणवाडी पोलीस ठाणेतर्गंत येत असलेल्या बघोली गाव परिसरात अनोळखी मानसिक रुग्ण असलेली महिला फिरत असल्याची माहिती जेसीआयचे समाजसेवक व उपविभागीय अभियंता वासुदेव रामटेककर यांनी दुरध्वनीवर आंभोरा निवासी सिध्दार्थ वंजारी यांनी दिली.त्या माहितीच्या आधारे श्री.रामटेककर यांनी जेसीआईच्या पूर्व अध्यक्षा एड. किर्ती आहूजा व भूमी वतवानी यांच्यासह बघोली गावाला भेट देत त्या मानसिक महिला रुग्णाची विचारपुस करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला.मात्र स्मृतिभंग झाल्याने 20 वर्षीय असलेली ही मुलगी स्वतः चे नाव आदी माहिती काहीच सांगू शकली नाही.परंतु तिच्या भाषेवरुन ती ओडिसा किंवा पश्चिम बंगालकडील असावी अंदाज लावून सदर मानसिक रुग्ण असलेल्या मुलीची माहिती रावणवाडीचे पोलीस निरिक्षक अभिजित भूजबळ यांना दिली.त्यानंतर पोलीस निरिक्षक भुजबळ यांनी प्रकरणाचे गांर्भीय लक्षात घेत महिला पोलिसांच्या मदतीने त्या मानसिक रुग्ण महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करुन तिची तपासणी केल्यानंतर नागपूर येथील प्रादेशिक मानसिक रुग्णालय नागपूर येथे पुढील उपचाराकरीता पोलीस शिपाई फनेन्द्र बिंजवार, महिला पोलिस मोनिका डोंगरेच्या संरंक्षणात रवाना केले.या कार्यात सहकार्य केल्याबद्दल श्री रामटेककर यांनी रावणवाडीचे पोलीस निरिक्षक अभिजीत भुजबळ, महिला पोलिस योगिता हजारे, पूजारीटोला-बघोलीवासी दानेश्वर गौतम,सिद्धार्थ वंजारी, केटीएस रुग्णालयाचे डॉ.लोकेश चिरवतकर,डॉ स्नेहा शर्मा यांचे आभार मानले.





