गोंदिया,दि.29ः जिल्ह्यातील आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार व विद्यमान सभापती केशवराव मानकर यांच्या नेतृत्वातील भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलने 18 पैकी 14 जागा जिंकून आपले वर्चस्व कायम ठेवले.तर भाजप बंडखोर गट व काँग्रेसआघाडीच्या पॅनलने 4 जागा जिंकल्या.या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी समर्थित पॅनेलचे संतोष नागपुरे, केशवराव मानकर, टिकाराम मेंढे, अनील शर्मा, राजेश भक्तवर्ती, युवराज बिसेन, विनोद कन्नमवार, शशिकला दोनोडे, चिंतनबाई तुरकर, गणेश हर्षे, उत्तम नंदेश्वर, सचीन अग्रवाल, सोमेश असाटी आणि महेश चुटे तर भाजपचा फुटीर गट आणि कॉंग्रेस समर्थित भूपेश अग्रवाल, हुकूम बोहरे, संजय बहेकार, महेश उके हे निवडून आले.
अर्जुनी मोरगाव बाजार समितीच्या निवडणुकीत मात्र भाजपसमर्थित पॅनलने 9 जागा व काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना ठाकरे गटाच्या आघाडीने 9 जागा जिंकल्याने याठिकाणी सत्तेसाठी फोडाफोडीचे राजकारण महत्वाचे ठरणार आहे.विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापूरे की माजी आमदार राजकुमार बडोले सत्तेची चाबी आपल्याकडे ठेवतात यावरच पुढील राजकारणाचे गणित ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कायम टिकणार की जिल्ह्यातील समीकरणानुसार भाजपला जाऊन मिळणार याकडेही लक्ष लागले आहे.या निवडणुकीत भाजपा समर्थीत पॅनलकडून लायकराम भेंडारकर,काशीमजमा कुरेशी,रतीराम कापगते,प्रदीप मस्के,व्यंकट खोब्रागडे,आशा नाकाडे,शारदा नाकाडे,वामन राऊत व नवल चांडक(अविरोध) निवडून आले.तर महाविकास आघाडीच्यावतीने यशवंतराव परशुरामकर(राकाँ),लोकपाल गहाने (रांकाँ),होमदास ब्राम्हणकर(उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना),सर्वेश भुतडा(अविरोध) (काँग्रेस),किशोर ब्राम्हणकर(राकाँ),मोरेश्वर सोनवाणे(काँग्रेस),हेमकृष्ण(दादा) संग्रामे(राकाँ),अनिल दहिवले(काँग्रेस) व खुशाल गेडाम(कांँग्रेस) निवडून आले.





