गोंदिया,दि. 30 : 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनानि मित्त छत्रपती शिवाजी पार्क, दादर (मुंबई) येथे आयोजित संचलनामध्ये गोंदिया- गडचिरोली सी-60 पथकाने सहभागी 21 पथकांमधून सर्वोत्कृष्ट संचलन केल्यामुळे महाराष्ट्र शासनाने गोंदिया – गडचिरोली सी-60 पथकाला प्रथम क्रमांकाने सन्मानित केले आहे. दि.29/04/2023 रोजी छत्रपती शिवाजी पार्क, दादर (मुंबई) येथे आयोजित बक्षिस वितरण कार्यक्रमामध्ये अनुप कुमार, अपर पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे हस्ते गोंदिया-गडचिरोली सी-60 पथकाचे नेतृत्व करणारे पथक प्रमुख श्री. देवीदास कठाळे, पोलीस निरीक्षक, गोंदिया यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
.निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक, गोंदिया, निलोत्पल, पोलीस अधीक्षक, गडचिरोली व अशोक बनकर, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया यांनी संचलनामध्ये सहभागी असणारे गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक देवीदास कठाळे, पोलीस उप निरिक्षक खेडकर, ढाकणे आणि गडचिरोली पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक अमोल फडतरे, पोलीस उप निरीक्षक सतिश पाटील, बोडरे यांचे तसेच संचलनामध्ये सहभागी झालेल्या सी-60 पथकातील सर्व कमांडोंचे अभिनंदन करून कौतुक केले आहे. व सी-60 पथक कायम सर्वोत्कृष्ट राहण्याकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.





