गोरेगाव-1 मे महाराष्ट्र दिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्यात साजरा केला जात आहे अशा वेळी महाराष्ट्रदिनी पिंडकेपार ग्रामपंचायतच्या सरपंचानी घेतलेल्या क्रांतिकारक निर्णयाने संपूर्ण गावाला सुखद धक्का दिलाय.गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पिंडकेपार गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात मुख्य ध्वजारोहण करण्याचा निर्णय सरपंच योगिता शहारे यांनी घेतला. 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गावातील ज्येष्ठ नागरिक हगरू बिसेन यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. यादरम्यान मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक हगरुजी बिसेन यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार पण करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सरपंच योगिताताई शहारे, उपसरपंच भरत घासले ,ग्रामपंचायत सदस्य नीलकंठ बिसेन, चंद्रकिशोर पटले, मंगलाताई पटले, रेखाताई रहांगडाले, रूपाताई लटये, कलाताई चौधरी, ग्रामसेवक बैस मॅडम, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्रनाथ मेश्राम , माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश बिसेन, जि प शाळेचे मुख्याध्यापक पी डी पटले , शिक्षक एम टी कटरे, वाय बी बोपचे, शोभेलाल कटरे, विकास हायस्कूल शाळा समितीचे अध्यक्ष खोमेंद्र बिसेन, ग्राम रोजगार सेवक रविंद्र साखरे, संगणक चालक प्रशांत साखरे, राजेश चूलपार आदि मोठ्या संख्येत उपस्थित होते. 
ग्राम पंचायत मोहाडी येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
गोरेगाव-तालुक्यातील ग्रांम पंचायत मोहाडी येथे दिनांक ०१ मे ला महाराष्ट्र दिनानिमित्त सेवानिवृत्त शिक्षक वाय.एफ.पटले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत मोहाडीचे उपसरपंच मोहनलाल पटले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी ग्रामपंचायत सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे, ग्रांम पंचायत सदस्य योगराज भोयर, खेमराज वाकले,भिवराज शेंडे,पुस्तकला पटले, नेहाताई उके, चंन्द्रकांता पटले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे.जे.पटले,माजी उपसरपंच श्रीराम पारधी, सामाजिक कार्यकर्ता प्रमानंद तिरेले, ओमकार येळे,मुलचंद गोळगे,भरतलाल चाचेरे, जिल्हा परिषद शाळाचे मुख्याध्यापक रायकवार मॅडम, पोस्टमास्टर खुमेश्वर डोहळे,भुराजी भोयर व सर्व अंगणवाडी सेविका, शिक्षक गण व शालेय विद्यार्थ्यी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन व आभार जिल्हा परिषद शाळेचे पदवीधर शिक्षक ए. के. वंजारी यांनी केले.




