25.8 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ मोहगाव बु.ग्रामपंचायतीच्यावतीने कृषी सहाय्यक पारधींचा सत्कार

मोहगाव बु.ग्रामपंचायतीच्यावतीने कृषी सहाय्यक पारधींचा सत्कार

0
30

गोरेगाव,दि.01ः– तालुक्यातील मोहगाव बु.येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामाबद्दल कृषी सहाय्यक देवेंद्र पारधी यांचा सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायतचे सरपंच ज्योतिकाताई कुमरे होत्या.प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच कमलेश रहांगडाले,तंटामुक्ती अध्यक्ष गणराज पटले,पोलीस पाटील राऊत मॅडम, प्रगतिशील शेतकरी मनीराम पटले,हिरालाल पटले,भूषणराव जयतवार,गोरेगाव फार्मर ऍग्रो प्रोडूसर कंपनीचे संचालक हरीष कटरे,ग्रामविकास अधिकारी चिंधालोरे,ग्रामपंचायतचे सर्व सदस्य ,पदाधिकारी ग्रामपंचायतचे कर्मचारी व बहुसंख्य शेतकरी बंधू भगिनी उपस्थित होते. आजच्या प्रसंगी ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक पंढरू यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला.