रवींद्र दरेकर यांची काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती

0
11

गडचिरोली,- आरमोरी येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवींद्र दरेकर यांची पक्षाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.काँग्रेसचे अ.भा.महासचिव जनार्दन द्विवेदी यांनी काल नवी दिल्लीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. या कार्यकारिणीत रवींद्र दरेकर यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रवींद्र दरेकर हे १९८४ ते ८९ या कालावधीत एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष होते. त्यानंतर १९८९ ते ९२ पर्यत ते एनएसयूआयचे प्रदेश उपाध्यक्ष राहिले. १९९४ ते ९९ या कालावधीत त्यांनी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सांभाळले. १९९९ पासून २००३ पर्यंत श्री.दरेकर यांनी युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव म्हणूनही काम केले. २००३ ते २००६ या कालावधीत राज्य शेतमाल मूल्यनिर्धारण समितीचे सदस्य असताना केंद्रीय आयोगासमोर राज्य शासनाची बाजू मांडण्याची संधी त्यांना दोनदा मिळाली.. प्रदेश काँग्रेसचे सचिव म्हणून नियुक्ती केल्याबद्दल दरेकर यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, अ.भा.काँग्रेस समितीचे महासचिव मुकुल वासनिक, अ.भा.काँग्रेस समितीचे सचिव खा.अविनाश पांडे यांचे आभार मानले आहेत.