30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ प्रवीण दटके, दयाशंकर तिवारींना नोटीस

प्रवीण दटके, दयाशंकर तिवारींना नोटीस

0
22

नागपूर : कस्तूरचंद पार्कवर ७ एप्रिल रोजी हनुमान चालिसा पठण कार्यक्रम घेताना उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन झाले नाही, असा दावा करून नागरी हक्क संरक्षण मंचचे अध्यक्ष जनार्दन मून यांनी अवमानना याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स्वप्ना जोशी यांनी शुक्रवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर महापौर प्रवीण दटके, मनपा सत्तापक्ष नेता दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. प्रकरणावर आता उन्हाळ्याच्या सुट्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे.

हनुमान चालिसा पठण कार्यक्रमात सहभागी होणार नाही व या कार्यक्रमाशी काहीही संबंध नसल्याचे व्यापक प्रसिद्धीसह जाहीर करण्यात येईल, अशी ग्वाही महानगरपालिकेने दिल्यानंतर न्यायालयाने हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाला हिरवी झेंडी दाखविली होती. त्यापूर्वी एड्स जनजागृती व हनुमान चालिसा पठण कार्यक्रम एकत्र घेण्यात येणार असल्याची जाहिरात करण्यात आली होती.यामुळे मून यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

blank