41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News काबुलमधील आत्मघाती स्फोटात 24 जणांचा मृत्यू

काबुलमधील आत्मघाती स्फोटात 24 जणांचा मृत्यू

0
25

blank

काबूल- अफगानिस्तानची राजधानी काबूलमधील भारतीय दुतावासाजवळ झालेल्या शक्तिशाली स्फोटात 24 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय दुतावासातील सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. दुतावासापासून 3 किलोमीटर अंतरावर हा स्फोट झाला आहे.

मिळालेली माहिती अशी की, तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. काबूलमधील सीक्रेट सर्व्हिस यूनिटच्या बिल्डिंगवर तालिबान्यांनी हल्ला चढवला. दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेला ट्रकने हा स्फोट घडवून आणला. हल्लेखोर घटनास्थळी उपस्थित असून ते अंदाधूंद गोळीबार करत आहेत. या घटनेत आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सीक्रेट सर्व्हिस यूनिट व्हीआयपीजला प्रोटेक्शन देण्याचे काम करते.

blank