
भाजयुमो ची नियोजनात्मक बैठक संपन्न
गोंदिया: 08 जून-भारतीय जनता युवा मोर्चा गोंदिया जिल्हा तर्फे 30 मे ते 30 जुन या कालावधीत MODI@9 महासंपर्क अभियाना संदर्भात दि. 08 जुन 2023 रोजी शासकीय विश्रामगृह येथे ओम कटरे यांच्या अध्यक्षतेखाली व संजय कुलकर्णी जिल्हा संघटन मंत्री यांच्या प्रमुख मार्गदर्शनात जिल्हा युवा मोर्चाची बैठक पार पडली.
केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारला 9 वर्ष पूर्ण झाले व त्यानिमित्त मोदीजी यांच्या नेतृत्वात देशात आणि राज्यात विकासाची गंगा आलेली आहे व त्याची माहिती घरा घरा पर्यंत पोहचावी यासाठी भाजपने modi@9 महासंपर्क अभियानाची सुरुवात केली आहे.”बैठकीत ओम कटरे यांनी सर्व युवा मोर्चा पदाधिकारी यांना स्वतःच्या क्षेत्रात केंद्रातून व राज्यातून आलेले घर चलो अभियान,मतदार नोंदणी,Y20 संवाद तसेच बाईक रॅली ह्या सर्व कार्यक्रमाचे लवकरात लवकर नियोजन करावे व आपल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी कसे होईल यावर लक्ष केंद्रित करावे असे सांगितले व समोरच्या वर्षी होऊ घातलेल्या निवडनुकीच्या दृष्टीकोनातून हा अभियान खूप महत्वाचा आहे त्यामुळे हा अभियान यशस्वी करने हे युवा मोर्चाचा कर्तव्य आहे असे प्रतिपादन केले.तसेच संपूर्ण जिल्ह्यात अभियानाचा आराखडा संजयजी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात आला. बैठकीत प्रामुख्याने कुणाल बिसेन, तिजेश गौतम, मिलिंद शेवाले, पारस पुरोहित, संदीप रहांगडाले, बाला वहिले, इंद्रजीत भटिया, विनोद पटले, आदित्य शर्मा, देवलाल जामरे, देवराम चुटे, अमित आर्य, गौरीशंकर पारधी, अमोल तितिरमारे, विवेक चौधरी, प्रवीण बोपचे, नितेश वालोदे, अजय लिल्हारे, प्रशांत कोरे, प्रवीण पटले, शिशुपाल रहांगडाले,फणिंद्र पटले,विक्की जगणे, उमेन्द्र उपराडे, विशाल दशरिया, गुलशन अंटरे,अजय रहांगडाले,संतोष कटरे, टीणु टेंभरे,उमेश रहांगडाले वासु कनोजे,अर्जुन लटपटे, पंकज उइके, राकेश टेम्भरे,व समस्त युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.





