41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ आदिवासी महिला शेतकऱ्यांनी मुरघास शेतीतून घेतले एकरी 25 हजाराचे उत्पादन

आदिवासी महिला शेतकऱ्यांनी मुरघास शेतीतून घेतले एकरी 25 हजाराचे उत्पादन

0
29

blank

गोंदिया- अदानी फाउंडेशन तिरोडा द्वारा जिल्हा प्रशासन गोंदियाच्या मार्गदर्शनाखाली तिरोडा तालुक्यातील  घोटी गावातील 50 महिला शेतकऱ्यांना मका लागवड शेती व मुरघास निर्मितीचे प्रशिक्षण  एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती पुणे येथे देण्यात आले.
सदर प्रशिक्षणानंतर घोटी येथील 50 महिला शेतकऱ्यांनी 50 एकर शेतीमध्ये मका लागवड केली. त्यानंतर त्याचे मुरघास तयार करून पाच रुपये किलो दराने तो मुरघास अदानी फाउंडेशन ने तयार केलेल्या तिरोडा शेतकरी उत्पादक कंपनी द्वारा सुरु असलेल्या अनुराधा डेअरी मधील दुग्ध उत्पादकांना विक्री करण्यात आला. त्यामुळे दूध उत्पादन वाढीसाठी पशुपालकांना मदत झाली आहे.या माध्यमातून एकरी 25 हजाराचे उत्पादन तीन महिन्यांमध्ये महिला शेतकऱ्यांना मिळविले.पारंपरिक शेतीला फाटा देत मुरघास निर्मिती हा सुद्धा एक चांगला उत्पन्नाचा स्रोत या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळाल्याचे अदानी फाउंडेशनचे हेड   बिमुल पटेल यांनी सांगितले.सदर मका लागवड व मुरघास निर्मिती या कार्यक्रमाच्या  यशस्वीतेसाठी अदानी फाउंडेशनचे कार्यक्रमाधिकारी कैलाश रेवतकर व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

blank