
भंडारा: भंडारा युवक बिरादरी द्वारे “आनंदाची डोही” हा सुंदर अभंगवाणी कार्यक्रम घेण्यात आला. चिमुकल्यांसह सर्व कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. भंडारा युवक बिरादरीद्वारे आषाढी एकादशी तसेच स्व. मनोज दाढी यांच्या स्मृतीदिना निमित्त ‘आनंदाचे डोही’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक पोलीस अधिक्षक लोहित मतांनी होते तर प्रमुख अतिथी म्हणून शुभांगी मेंढे उपस्थित होत्या.
युवक बिरादरीच्या वतीने नेहमीच विविध चांगले उपक्रम राबविण्यात येतात. पिढी घडवण्यासाठी हे उपक्रम अतिशय महत्त्वाचे ठरतात, असे प्रतिपादन यावेळी पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी केले. आपली संस्कृती, आपल्या परंपरा यांच्यासह आधुनिकतेकडे घेऊन जाणारे युवक बिरादरीचे कार्यक्रम कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन शुभांगी मेंढे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारा युवक बिरादरीच्या अध्यक्षा सरिता फुंडे होत्या. त्यांनी बिरादरी विविध क्षेत्रात जे कार्य करते त्या करिता सर्वांनी बिरादरीत सहभागी होण्याचे आवाहन केले. कलाकारांनी एकाहून एक सरस सुंदर गीत आणि अभंग म्हणत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. गायक कलावंत पार्थ गभने, लक्ष्मी अंबिलढूके, ओम जाधव, राघव बरडे, जानकी टिचकुले, श्रावणी हिवसे, प्रांशी पुराणिक, कृष्णा कटाइत, रुद्रा कावळे बासरी वादक, हर्मनियम वादक केसव खोब्रागडे, पियानो केशव खोब्रागडे मृदुंग वादक अनिमेश पथ्ये, तबला वादक प्रवीण कुंभारे यांचा समावेश होता.
उद्योजक रुपेश टांगले, सनफ्लॅग स्कूल वरठीचे प्राचार्य राजीव सिंग, उल्लास फडके, वन अधिकारी पी. एन. नाईक, आर. टी. मेश्राम, उद्योजक रमेश पुरूषार्थी,
सामाजिक कार्यकर्ते पियुष महाकाळकर, नितीन खेडिकर, नितीन निनावे, आर्ट ऑफ लिव्हिंग भंडारा शाखा, भंडारा -वैष्णवी शिंपी समाज, जय श्री राम भजन मंडळ भंडारा, आदी मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात भंडारा युवक बिरादरीच्या नवीन कार्यकारिणीच्या सभासदांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला भंडारा युवक बिरादरीचे सुरेन्द्र कुलरकर, विक्रम फडके, वैभव कोलते, वर्षा म. दाढी, राधेश्याम बांगडकर, यशपाल कऱ्हाडे, प्रणित उके, प्रवीण कुंभारे, विशाल जाखमाते, राजेंद्र पवणकर, केतन काटेखाये, मेघा मिश्रा, मोरेश्वर समरीत,
विद्यार्थी प्रतिनिधी खुशी कावळे, प्रियंका कोलते, सुनीता जांगडे, मेघा भागवत, हर्षा वैद्य, नेहा शेंडे, साक्षी ढोबळे, भाग्यश्री कांबळे, शुभम रोडगे, साहिल डोरले, पियुश गवरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विक्रम फडके यांनी केले…





