आ. रहांगडाले यांच्या हस्ते मुंडीकोटा येथे ३० लक्ष रुपयाच्या कामांचे भूमिपूजन

0
25

तिरोडा:- तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील अल्पसंख्यांक भागात विकास कामांसाठी तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार यांनी एकूण ७५ लक्ष शासनाकडून मंजूर करवून घेतले असून त्यापैकी मुंडीकोटा येथे कब्रस्थानात विविधविकासकामांचे भूमिपूजन आज आमदार महोदयांच्या हस्ते संपन्न झाले. यामध्ये प्रामुख्याने मुंडीकोटा मुस्लीम कब्रस्थान येथे आवारभिंत बांधकाम करणे १०.०० लक्ष, ईदगाह बांधकाम करणे १०.०० लक्ष, सभागृह बांधकाम करणे १०.०० लक्ष अशा एकूण ३०.०० कामांचा समावेश आहे. भूमिपूजन कार्यक्रमाला प्रामुख्याने कृऊबास सभापती जितेंद्र रहांगडाले,जि.प.सदस्य पवन पटले उपसभापती भूमेश्वर रहांगडाले, संचालक तथा ग्रा.प.सरपंच प्रतिमा जैतवार, संचालक रविंद्र (बाला) वहिले, डॉ.गोवर्धन चव्हाण, मा.उपसभापती विजय डिंकवार, उपसरपंच देवेंद्र मंडपे,व कब्रस्थान कमेटीचे सदस्य उपस्थित होते.