
खासदार प्रफुल्ल पटेलांना निवेदन देऊन मागणी
गोंदिया —जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार राजेंद्र जैन यांची नामनिर्देशित आमदार पदी निवड करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल हे दिनांक २८/०७/२०२३ रोज शुक्रवार ला खासदार प्रफुल्ल पटेल हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले.
राजकारणाचा प्रदिर्घ अनुभव, जनमानसात मिसळणारे, गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव झटणारे माजी आमदार राजेंद्र जैन हे नेहमी जनतेत मिसळून राहतात.सध्याची राज्यातील राजकीय स्थिती बघता व पक्षसंघटना मजबुत करण्यासाठी त्यांची नामनिर्देशित आमदार म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी केली.देशहित आणि जनकल्याणाला आपण नेहमीच प्राधान्य दिले.गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या विकासाचे आपले ध्येय व कार्य येथील जनता कधीच विसरू शकत नाही.आपल्या प्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो.त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनसामान्यांचा पक्ष झाला आहे.
पक्षसंघटन मजबुत करण्यासाठी राजेंद्र जैन साहेब कसोशीने प्रयत्न करतात.त्यांची पक्षनिष्ठा सर्वश्रुत आहे.गोंदिया भंडारा जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्याचे काम त्यांनी केले.राज्यातील बारा नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्ती चा सर्वोच्च न्यायालयाने मार्ग मोकळा केला आहे.राजेंद्र जैन यांचा प्रदिर्घ अनुभव गोंदिया भंडारा नागपूर जिल्ह्यासह शेजारच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राजेंद्र जैन साहेब यांची नामनिर्देशित आमदार म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंजि यशवंत गणविर यांनी केली.





