जयस्वाल महाविद्यालयात स्वच्छता शपथ घेऊन राष्ट्रीय रासेयो स्थापना दिवस साजरा

0
14

अर्जुनी/मोर- स्थानिक शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापनादिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एस. डांगे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयक्यूएसी समन्वयक डॉ के जे सीबी, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. एम आर दर्वे प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाने राष्ट्राच्या उभारणीसाठी सामाजिक कार्यात सक्रिय व्हावे, असे डॉ. डांगे यांनी विचार व्यक्त केले. प्रमुख अतिथी डॉ. सीबी यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वात त्या काळातील विद्यार्थ्यांनी आंदोलन करून देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून दिले. आजच्याही तरुणांनी त्यातून प्रेरणा घ्यावी, असे मार्मिक विचार व्यक्त केले. प्रा. कापगते यांनी रासेयो अंतर्गत विविध उपक्रम महाविद्यालयात वर्षभर राबविल्या जातात. यात भाग घेऊन विद्यार्थ्यांनी श्रमसंस्कार, व्यक्तिमत्व विकास करावा असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कावळे यांनी केले. स्वच्छ्ता पंधरवडा निमित्त स्वच्छ्ता शपथ सर्व विद्यार्थ्याना देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन कू. अमिषा चौधरी हिने तर आभारप्रदर्शन कू. हसीना मेश्राम हिने केले. सर्व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. मोतीलाल दर्वे, डॉ. आशिष कावळे, प्रा. स्वाती मडावी मॅडम, प्रा. लक्ष्मीकांत कापगते, प्रा. पंकज उके, प्रा. अंकित नाकाडे, तसेच रासेयो स्वयंसेवक यांनी परीश्रम घेतले.