* स्वच्छता ही सेवा 2023 अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन
सडक अर्जुनी – स्वच्छता ही सेवा 2023 अंतर्गत सडक अर्जुनी पंचायत समिती येथे आरोग्य तपासणी शिबिर व स्वच्छता मित्र सत्कार कार्यक्रमाचे आयोजन आज 25 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन उपसभापती शालिंदर कापगते यांच्या हस्ते सभापती संगीता ताई खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी डी. एम. खोटेले, पंचायत समिती सदस्य शिवाजी गहाने, पं.स.सदस्य चेतन वडगाये, पंचायत समिती सदस्या सौ. वर्षा शहारे, प.स. सदस्या सपना नाईक, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा कक्षाचे शालेय स्वच्छता व आरोग्य सल्लागार भागचंद्र रहांगडाले उपस्थित होते.
यावेळी गाव पातळीवर स्वच्छता संबंधित कार्य करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच गाव पातळीवर स्वच्छते संदर्भात काम करणाऱ्या स्वच्छता मित्रांचा उपस्थित अतिथी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य पर्यवेक्षक शेंडे यांनी तर आभाप्रदर्शन गट समन्वयक राधेश्याम राऊत यांनी मानले.