
अर्जुनी/मोरगाव – तालुक्यातील केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोठणगाव येथिल रहिवाशी आरोपी नामे जितेन्द्र तुळशिराम गजभिये वय 40 वर्ष, आणि सौ.सिंधु जितेन्द्र गजभिये ऊर्फ सिंधु मनिराम कोचे वय 40 वर्ष यांना अर्जुनी/मोरगावचे उपविभागीय दंडाधिकारी वरुणकुमार सहारे यांच्या आदेशान्वये कलम 56 (अ) महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये दि.11 ऑक्टोबर 2023 रोजी एक महिन्यासाठी गोंदिया जिल्ह्यातून पाच गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आलेले होते.त्यापैकी सदर दोन आरोपी हे हद्दपार आदेशाचा भंग करून पुन्हा गोठणगाव येथे येऊन वास्तव्य करीत असल्याची गोपनीय माहिती पोलीसांना मिळाल्याने केशोरी पोलीसांनी याप्रकरणी कसलाही विलंब न करता तात्काळ शहानिशा केली असता सदर दोन आरोपी यांनी हद्दपारीच्या आदेशाचा भंग करून गोठणगाव येथे परत आल्याची खात्री झाली.
सदर आरोपी यांनी हद्दपारीच्या आदेशाचा भंग करून कोणतीही परवानगी नसतांना देखिल गोंदिया जिल्ह्यात परत येऊन गोठणगाव येथे राहू लागले म्हणून ठाणेदार सोमनाथ कदम यांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला व सखोल तपास करून आरोपींविरुद्ध प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अर्जुनी/मोरगाव यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.यासंदर्भात कोणत्याही कायद्याचा किंवा आदेशाचा भंग किंवा अवमान करणाऱ्या आरोपींची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही त्यांच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई केली जाईल असा विश्वास देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनी जनतेला दिलेला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे,अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बनकर,देवरी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम,पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड,पोलीस हवालदार उदयभान इंदूरकर,प्रेमदास होळी,राहुल चिचमलकर,कैलाश राऊत,प्रसन्या सुखदेवे यांनी केलेली आहे.