गोंदिया:-जिल्ह्याची निर्मिति 1 में 1999 ला झाली असून 22 वर्षाचा काळ लोटून गेला तरीही जिल्ह्याच्या अनेक विभागात अनेक पदे अजूनही रिक्त आहेत किंवा पद निर्मिती झालेली नाही. त्यातच माध्यमिक शिक्षण विभाग, वेतन पथक(माध्य.), वेतन पथक (प्राथ.) आणि वरिष्ठ लेखा परीक्षण या कार्यालयातील मंजूर पदे भरण्यात यावे, या मागणी चे निवेदन भाजप शिक्षक आघाडी च्या शिष्टमंडळाने रोज शुक्रवारी (दि.२०) मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी
चिन्मय गोतमारे यांच्या मार्फत देण्यात आले.
फक्त एकमेव शिक्षण अधिकारी हे पद भरलेले आहे. इतर पदांचे कार्य हे खाजगी शाळेतील व जिल्हा परिषदेच्या उसनवार कर्मचाऱ्यांच्या भरवसा वर सुरु आहे. त्यामुळे उसनवार कर्मचाऱ्यां वर वचक नसल्यामुळे कासव गतीने काम सुरु आहे. याचा फटका शाळेच्या कामाने या कार्यालयात येणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर, पालक व विद्यार्थी यांना बसतो. कामे वेळेवर होत नाहीत. या गंभीर समस्ये कडे लक्ष देऊन या कार्यालयातील कर्मचा ऱ्यां ची रिक्त पदे तातडीने भरावी, या मागणी चे निवेदन देते वेळी शिस्ट मंडळात राज्य कार्य करिणी चे पदाधिकारी अरुण पारधी, लीलेशवर बोरकर, जनता शिक्षक संघा चे लक्ष्मण आंधळे,आघाडी चे जिल्हा संयोजक चरणदास डहारे,सह संयोजक मुन्नालाल कटरे, अनिल कटरे, भेरसिंग बिसेन, पी. सी. बोपचे, सतीश मंत्री, दिनेश कोहळे , प्रकाश बोंदरे , मनोज येले आदि पदाधिकारी उपस्थित होते.