
=अर्जुनी मोर. येथे अशोक विजया दशमिचा एकच जल्लोष
अर्जुनी मोर.- तुझाच गौतमा पडे प्रकाश अंतरी, तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी,14 ऑक्टोबर 1956 ला महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक नागपुरच्या दिक्षा भुमीवर लाखो बौध्द बांधवांना बौध्द धम्माची दिक्षा दिली. हा दिवस बौध्द बांधवांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहावा असाच आहे.संपुर्ण भारतासह विदेशातही हा दिवस उत्साहाने मानला जातो.त्याचाच एक भाग म्हणून अर्जुनी मोर. शहरात आज 24/10/2023 ला सम्राट अशोक विजयादशमीच्या पावनपर्वावर 67 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या थाटात साजरा होत आहे.
जहाली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळती तुझ्या गौतमाची पाऊले,आजचा दिवस बौध्द बांधवांसाठी चैतन्याचा, आनंदाचा,व सन्मानाचा व अभिमानाचा आहे. अर्जुनी मोर. शहरात तालुकास्तरीय धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या थाटात साजरा होत असतो.आज सकाळ पासुनच शहरातील प्रत्येक घरात धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा उत्साह व आनंद ओसांडुन वाहत होता.कोन सकाळी पुर्व दिशेला श्वरांजली वाहिते,गाऊनी भिमबुध्दाची गिते या गिताप्रमाणे शुभ्रवस्र परिधान करुन बौध्द उपासक, उपासिका व तरुण वर्गाची पाऊले बौध्द विहाराकडे शेकडोच्या संख्येनी जात होती.अर्जुनी मोर.शहरातील प्रत्येक बुध्द विहारात ध्वजारोहन, बुध्द वंदना, व पंचशिल ग्रहण करण्यात आले. आज अर्जुनी मोर. शहरातील जुन्या बसस्थानकावर खिरदान वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.तिबेटीयन बौध्द भिक्षु यांचे वतीने महामानवांच्या प्रतिमांना माल्यार्पण करुन बुध्द वंदना व पंचशील ग्रहण करुन खीर वाटपाच्या कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा मंजुषा बारसागडे, नगरसेवक दानेश साखरे, यशकुमार शहारे, नगरसेविका शिलाबाई उईके,वैद्यकीय अधिकारी डाॅ. भारत लाडे, विज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता अमित शहारे, युवा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत लाडे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नानाभाऊ शहारे, बादल लाडे, तुषार सांगोळे, नाशिक शहारे, अमण टेल्लर, अभियंता स्नेहील मेश्राम, वतन शहारे,सुधिर राऊत, आकाश शहारे, महेश सांगोळे, नेहरु चव्हाण, जगदीश मेश्राम,केतन शहारे, कुणाल मेश्राम,धनंजय गोंडाणे,दिलीप शहारे,अशोक शहारे,गणपत चौधरी व शेकडो कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.