आयुष्मान ग्रामपंचायतीचा होणार सत्कार

0
81

ग्रामपंचायतीनी कार्यक्षेत्रातील 100 टक्के पात्र लाभार्थ्यांना आयुष्मानचे कवच प्रदान करा
1356 आजारांवर मोफत उपचाराचे आयुष्मान कार्ड काढण्यासाठी ग्रामपंचायतीनी पुढाकार घ्यावा…..
2 लाख 32 हजार 976 लाभार्थ्यांना मिळाले आयुष्मानचे कवच
जिल्ह्यात 7 लाख 91 हजार 131 लाभार्थी५ लाखांपर्यंत मोफत उपचार सुविधा

गोंदिया (दि.03 नोव्हेंबर): आयुष्मान भारत योजनेंतर्गत शासनाने 5 लाखापर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी आयुष्मान कार्ड तयार करणे अनिवार्य आहे. यातूनच जिल्ह्यात सदर योजनेचे एकूण 7 लाख 91 हजार 131 लाभार्थी असून यापैकी आतापर्यंत 2 लाख 32 हजार 976 लाभार्थ्यांनी आयुष्मानचे कार्ड काढल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी दिली आहे.
शासनाने आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती  वाढवल्याने गोरगरिबांना आरोग्यविषयक उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. 1356 आजारांवर आता मोफत उपचार मिळणार आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि केंद्र सरकारच्या पंतप्रधान आयुष्मान योजनेचे एकत्रीकरण करुन या योजने अंतर्गत 5 लाखापर्यंत मोफत उपचाराची सुविधा नागरिकांना मिळणार असल्याने लोकांनी आपले आजाराचे कवच गोल्डन कार्ड म्हणजेच आयुष्मान कार्ड काढुन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन अनिल पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यात 548 ग्रामपंचायती असुन आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी हे 2011 साली झालेल्या सामाजिक, आर्थिक व जात निहाय जनगणनेच्या आधारावर असून या यादीत नाव असणारा व्यक्ती या योजनेचे पात्र लाभार्थी आहेत. प्रत्येक ग्रामपंचायती कार्यक्षेत्रात पात्र आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी शिल्लक आहे. ग्रामपंचायती प्रशासनाने आपल्या कार्यक्षेत्रातील 100 टक्के पात्र लाभार्थ्यांचे आयुष्मान गोल्डन कार्ड काढुन घेण्याचे नियोजन करावे. जिल्हा परिषदेमार्फत असे आयुष्मान ग्रामपंचायतीचा सत्कार करण्यात येणार असल्याचे मा.अनिल पाटील यांनी म्हटले आहे.भविष्यात आजार होवुन उपचारासाठी बिकट आपत्ती उदभवु नये यासाठी आजच आयुष्मान कार्ड काढुन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मा.अनिल पाटील यांनी केले आहे.
हे कार्ड सीएससी केंद्र, आपले सरकार केंद्र, ग्रामपंचायतीचे सेतु केंद्र, या योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालय व सद्य स्थितीत आरोग्य विभागामार्फत ई-के.वाय.सी. द्वारे तयार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी दिली आहे.
समाजातील सर्व घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी तसेच आरोग्याची सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी ‘आयुष्यमान भव’ मोहीम जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत आरोग्याशी संबंधित विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य विभागामार्फत आयुष्मान गोल्डन कार्ड काढण्याविषयी महत्वपुर्ण जनजागृती करण्यात येत आहे. आजार होण्याची वाट न बघता आजच आपले आयुष्मान गोल्डन कार्ड काढुन जबाबदार नागरिक बनुन आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याबाबत आवाहन जिल्हा आरोग्य प्रशाननाने केले आहे.
आयुष्मान भारत योजनेंतर्गत सहभाग नोंदवून गोल्डन कार्ड काढण्यासाठी गावातील सरकारी दवाखाना, ग्रामपंचायत, नजीकचे सीएससी केंद्र, आपले सरकार केंद्र येथे संपर्क करून ते कार्ड काढू शकता येत आहे. त्याठिकाणी लाभधारकाला सदरील कार्ड मोफत काढून दिले जात असल्याची महिती मा.अनिल पाटील यांनी दिली आहे. तसेच आता आयुष्मान कार्ड बनवणे अधिक सोप झाले असून कोणताही लाभार्थी घरी बसूनच हे आपले पाच प्रकारच्या टप्प्यात जावून काढू शकतो.
आयुष्मान भारत योजना’ सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील 72 हजार लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला असून या रुग्णावर ठरवून दिलेल्या अंगीकृत रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. पाच लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार, विविध दवाखान्यांचा समावेश, उपचाराचा पाच लाखापर्यंत खर्च शासन करणार असून कुटुंबातील सर्व व्यक्तींना ही योजना लागू राहील अशी माहिती प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. जंयती पटले यांनी दिली आहे.
आयुष्मान भारत योजना ही सर्वसामान्यांच्या हिताची आहे.1356 आजारांवर मोफत उपचाराचे आयुष्मान कार्ड काढण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा. जिल्ह्यात 7 लाख 91 हजार 131 एवढे लाभार्र्थी असुन  या लोकांना आयुष्मान कार्ड लवकर मिळण्याच्या दृष्टिकोनातुन गावातील आशा सेविका, ग्रामपंचायत , उपकेंद्र , प्राथमिक आरोग्य केंद्र. सीएससी केंद्र, आपले सरकार केंद्र ई. ठिकाणी आयुष्मान कार्ड तयार करण्याची सोय उपलब्ध तयार करण्यात आली आहे. आता लाभार्थी सुद्धा स्वत: आपल्या घरीच आयुष्मान कार्ड तयार करु शकतो असे तंत्रज्ञान निर्माण केले आहे.तरी या योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती होत आहे. जिल्ह्यात 548 ग्रामपंचायती असुन प्रत्येक ग्रामपंचायती कार्यक्षेत्रात पात्र आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी शिल्लक आहे. ग्रामपंचायती प्रशासनाने आपल्या कार्यक्षेत्रातील 100 टक्के पात्र लाभार्थ्यांचे आयुष्मान गोल्डन कार्ड काढुन घेण्याचे नियोजन करावे. जिल्हा परिषदेमार्फत असे आयुष्मान ग्रामपंचायतीचा सत्कार करण्यात येणार आहे.