गोंदिया,दि.06- येथील प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावर असलेल्या गोंंदिया ग्रामीण तहसिल कार्यालयातील एक कर्मचारी आज 6 नोव्हेंबरला आपल्या कार्यालयीन कामकाजाच्यावेळेस दिवसढवळ्याच दारुच्या नशेत असल्याचे बघावयास मिळाले.सदर कर्मचारी हा नेहमीच दारुच्या नशेत काम करीत असल्याचेही यावेळी एैकावयास मिळाले असून असफाक सैय्यद असे नाव आहे.सदर कर्मचारी नशेत असल्याची माहिती नायब तहसिलदार प्रकाश तिवारी यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी सदर कर्मचार्यास दमदाटी केली असता नशेडी कर्मचार्यानेच उलट नायब तहसिलदारास गप्प रहा असा सल्ला दिला.तर तहसिलदार समशेर पठाण यांना याबाबत विचारणा करण्याकरीता भ्रमणध्वनीकेल्यावर मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही,त्यामुळे वरिष्ठ अधिकारी आपल्या अधिनस्थ कर्मचार्यावर कशापध्दतीने नजर ठेवतात हे दिसून आले.