प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कारागिरांसाठी ठरणार वरदान – बांधकाम सभापती संजय टेंभरे

0
14

गोंदिया- देशाचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून बारा बलुतेदार असणाऱ्या ग्रामीण व शहरी भागातील कारागिरांसाठी विश्वकर्मा योजना राबविली जात आहे. ही योजना ग्रामीण भागातील कारागिरांसाठी वरदान ठरणार असून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी केले.
गोंदिया तालुक्यातील पारडीबांध येथे दिवाळीच्या पर्वावर लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दवणीवाडा भाजप मंडळ अध्यक्ष धनेंद्र अटरे, जिल्हा परिषद सदस्य अंजली अटरे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरजलाल महारवाडे, जिल्हा परिषद सदस्य दीपा चांद्रिकापुरे, गोरेगाव प.स.उपसभापती राजकुमार यादव, माजी जि.प.सदस्य राजेश चतुर, पंचायत समिती सदस्य शंकरलाल टेंभरे, पारडीबांध सरपंच पदम भाऊ चौरीवार, डोंगरगाव सरपंच टेंभरे ताई, सरपंच उईके ताई, फुलचुर सरपंच मिलन रामटेककर, उपसरपंच सोनवाणे, सुभान रहांगडाले, महेंद्र शहारे, देवलाल पटले, सुनील गराकाटे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाविषयी माहिती दिली.