उपायुक्त विक्रम साळी ग्रामीणचे अप्पर अधिक्षक
अमरावती, दि. २1 : अमराती जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांच्या जागी आता नवे पोलीस अधिक्षक म्हणून नागपुर येथील विशाल सिंगुरी यांची बदली झाली आहे. दरम्यान, शहर पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांची अमरावती ग्रामीण पोलीस दलात बदली झाली आहे.
अविनाश बारगळ पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. पोलीस महासंचालकांनी आज पोलीस अधिकाऱ्यांची बदलींची यादी जारी केली. यानुसार नागपुर येथील विशेष कृती गट नक्ष विरोधी अभियानाचे पोलीस अधिक्षक विशाल सिंगुरी यांची अमरावतीचे नवे पोलीस अधिक्षक (ग्रामीण) म्हणून बदली करण्यात आली आहे. याशिवाय ग्रामीण अप्पर पोलीस अधिक्षक शशीकांत सातव यांची नागपुर शहर दलात उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अमरावतीचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांची बदली झाली आहे.