चंद्रपूर: जुनोनाच्या जंगलात काड्या आणण्यासाठी गेलेल्या स्कूल बसचा चालक मनोहर वाणी (५२) यांच्यावर वाघाने हल्ला केला. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना आज, सोमवारी सकाळी घडली.
श्री जैन सेवा समिती व्दारा संचालित विद्या निकेतन हायस्कूल दादावाडी येथे स्कूल बस चालक म्हणून मागील पंधरा वर्षापासून कार्यरत असलेला मनोहर वाणी हा जुनोना बायपास मार्गावरील आंबेडकर नगर, संत तुकाराम चौक येथे वास्तव्याला होता.सोमवारी सकाळी जुनोनाच्या जंगलात काड्या आणण्यासाठी गेले असता त्यांच्यावर वाघाने हल्ला चढवून त्यांना जागीच ठार केले. त्यांच्यापश्चात दोन मुली व पत्नी असा परिवार आहे.