ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी साखर कारखाना ठरणार वरदान –खा.प्रफुल पटेल

0
11

नॅचरल ग्रोवर्स साखर कारखाना गाळप हंगामाचे खासदार पटेल यांच्या शुभहस्ते शुभारंभ

लाखांदूर,दि.28- परिस्थितीनुरूप हा कारखाना बंद पडला होता.पण वैनगंगा व चुलबंद नदीच्या खोऱ्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी व लोकोपयोगी कामांसाठी पुन्हा साखर कारखाना सुरु करण्यात आला आहे. निश्चितच लाखांदूर, पवनी, अर्जुनी मोर, साकोली, लाखनी, सडक अर्जुनी, देसाईगंज व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी वरदान ठरणार आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना अन्य पिकांच्या उत्पादनाचा पर्याय मिळावा व शेतीवर आधारित अन्य उदयोग यावेत याच उद्देशाने कारखाना सुरु करण्यात आल्याचे प्रतिपादन खा.प्रफुल पटेल यांनी केले.ते आज लाखांदूर जि. भंडारा येथील नॅचरल ग्रोवर्स साखर कारखान्याच्या पहिल्या गाळप हंगामाचे शुभारंभ, गव्हाण व मोळी पूजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

खा.पटेल पुढे म्हणाले की, कामांसाठी कोणतीही बोंबाबोंब न करता विकास कार्य करण्यावर विश्वास ठेवतो. शेतकरी व शेतमजुर व बेरोजगारांचे हितासाठी नेहमी प्रयत्न केले आहेत. सध्या साखर कारखान्याची क्षमता ८०० मेट्रिक टन असून पुढे कारखान्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. या कारखान्यामुळे परिसरातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार असून प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष पणे शेतमजूर व बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार आहे.

या शुभारंभ प्रसंगी खा.प्रफुल पटेल यांच्या सोबत माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, नानाभाऊ पंचबुद्धे,गंगाधर परशुरामकर,बाबा गुजर,सुनील फुंडे,धनंजय दलाल,यशवंत गणवीर,विनोद ठाकरे,अविनाश ब्राह्मणकर,  संजय गुजर,सत्यजित गुजर,विजय सावरबांधे,बालूभाऊ चुन्ने,लोकपाल गहाने, संजना वरखडे, निमाताई ठाकरे, कल्पना जाधव, डॉ अविनाश काशीवार,लोमेश वैद्य,हरीश तलमले, अड मोहन राऊत,धनु व्यास,नागेश पाटील, देविदास राऊत, दानेश साखरे,नरेंद्र चौधरी,बबन पिलारे,राकेश राऊत,उमेश राऊत,सचिन बरंय सहित मोठ्या संख्येने शेतकरी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.