जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोड़ा
तिरोड़ा – समर्थ भारताच्या निर्मितीचे तेजोमय स्वप्न व विद्येची आश्या इवल्याशा पाखरांच्या डोळ्यात फुलवण्याच्या उद्देशाने पं. स. तिरोड़ा आणि स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोड़ा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन व बक्षीस वितरण समारोह संपन्न झाला.
विद्यार्थ्यानी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करून नावीन्यपूर्ण कल्पनांना चालना देवून विकास करीत विज्ञानातील साहित्यामध्ये भर घालावी असे मार्गदर्शन कार्यक्रमाचे बक्षीस वितरक सौ. कुंताबाई पटले सभापती पं. स. तिरोड़ा आणि अध्यक्ष महोदय हूपराज जमाईवार उपसभापती पं. स. तिरोड़ा, यांनी केले.
जि.प. हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय तिरोड़ा येथे नुकताच 51 व्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत बक्षीस वितरण सोहळाचे प्रमुख अतिथी सतीश लिल्हारे खंडविकास अधिकारी पं. स. तिरोड़ा, व्ही. एस. चौधरी गटशिक्षणाधिकारी पं. स. तिरोड़ा, डी. बी. साकुरे वरीष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पं. स. तिरोड़ा, ए. एस. बरईकर वरीष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पं. स. तिरोड़ा, ब्रिजेस मिश्रा गटसमन्वयक बीआरसी तिरोड़ा,डी. एच चौधरी प्र. क्रे. प्र. कवलेवाडा,यू. पी. पारधी प्र. क्रे. प्र. न. प. तिरोड़ा, डी. सी. हीरापूरे प्र. क्रे. प्र. करटी बू., टी. बी. भगत प्र. क्रे. प्र. परसवाडा,यू. पी. बिसेन प्र. क्रे. प्र. चिखली, एस. एस बिसेन प्र. क्रे. प्र. गोंडमोहाडी, एम. बी. रतनपूरे प्र. क्रे. प्र. गुलाबटोला,वाय. टी. उईके प्र. क्रे. प्र. मुंडीकोटा,व्ही टी डोंगरे प्र. क्रे. प्र. वडेगाव, रवि भगत प्र. क्रे. प्र. गांगला,जी. झेड. ठाकरे प्र. क्रे. प्र. सुकडी/डाक, आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मीसाईल मैन अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण अर्पण करून दिप प्रज्वलित करण्यात आले. याप्रसंगी परीक्षक म्हणून पी. एम. खडसे क.म.शी. व एच. ए. नालट क.म.शी. जि.प.भारतीय विद्यालय एकोडी हे लाभले होते.
तद्नंतर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी 2023-24 चे निकाल जाहिर करण्यात आले यामध्ये विद्यार्थी गट वर्ग 6 वी ते 8 वी या गटातून जि.प. शाळा खूरख़ुडी (बस विंडो चेकर) शिवम उमेश मेश्राम प्रथम क्रमांक, जि. प. उच्च. प्रा. शाळा कवलेवाडा (ई – हाईवे प्रोजेक्ट) सुहानी पटले द्वितीय क्रमांक, जि. प. उच्च. प्रा. शाळा इंदोरा (करटी) (पोषक तत्व आणि अन्न) हिमांशु ठाकरे तृतीय क्रमांक, वर्ग 9 वी ते 12 या गटातून शहीद मिश्रा विद्यालय तिरोड़ा (मिड डे मील प्लेट वाशर) अवंति गोबाड़े प्रथम क्रमांक, जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोड़ा (सोलर सिस्टम विथ पिस्टन इंजिन) संजीव टेभेंबेकर द्वितीय क्रमांक, शांता बाई कारामोरे शाळा मुंडीपार (मटका खत) प्रिया पटले तृतीय क्रमांक, प्राप्त झाले.
शिक्षक गट वर्ग 6 वी ते 8 वी या गटातून प्रथम क्रमांक लोकेश चौरावार (सायन्स विथ फॅमिली) शहीद मिश्रा विद्यालय तिरोड़ा, द्वितीय क्रमांक खुशाल आगाशे (ऑटोमाँटिक इलेक्ट्रिक टेम्पो फॅन) जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोड़ा तर वर्ग 9 वी ते 12 वी या गटातून प्रथम क्रमांक मनीष कोल्हे (विज्ञान टीचिंग अँड) जि. प. हायस्कूल वडेगाव, द्वितीय क्रमांक उमेंद्र रहांगडाले (आटोमोबाइल पोलूसन सिक्युरिटी विथ सोलर एनर्जी) जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोड़ा, यांना प्राप्त झाले.
प्रयोगशाळा सहायक प्रथम क्रमांक कु. एस. ए. चौहान (हेल्थ) जि.प. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोडा, द्वितीय क्रमांक यशवंत अंबुले (हेल्थ ह्युमन) संत ज्ञानेश्वर शाळा बीहीरीया यांना प्राप्त झाले.
दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य जी. एच. रहांगडाले, के. बी. बन्सोड, पी. एस. रहांगडाले, कु. वाय. यू. राऊत, कु. रक्षिता मेश्राम, उमेंद्र रहांगडाले, के. जी. आगाशे, अनिल नेरकर, अरविंद ठाकरे, रमेश दमाहे, विनोद हरीणखेडे, कु. एस. डी. पटले, कु. शुभांगी मेश्राम, कु. ऊर्जा कटरे, बी. पी. बिजेवार, कु. रहांगडाले मॅडम, हरडे मॅडम, कु. स्मिता पोलशेट्टीवार, कु. श्वेता मेश्राम, कु. एस. ए. चौहान, श्री. मारबदे, देवा वरठे, मीना बाई खंगारकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.यावेळी कार्यक्रमाचे संचालन के. बी. बन्सोड व आभार कु. वाय. यू. राऊत मॅडम यांनी केले.