अर्जुुनी मोरगाव,दि.03: जिल्ह्यात २८ नोव्हेंबर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात धान तसेच इतर पिकांचे नुकसान झाले असून गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मुख्य उत्पादन व्यवसाय हा धान असून यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते आपली उपजीविका भागवितात, सध्या धान कापणीचे दिवस सुरू असून बहुतांश शेतकऱ्यांनी धानपिक कापून ठेवले आहेत, व कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात उभे धानपिक आहेत. अशा परिस्थितीत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतातील धानाचे कडप तसेच उभे धानपिक पाण्याखाली आल्याने मोठे नुकसान झाले आहे,यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.आणि म्हणून धानाला एकरी २५ हजार रुपये व कडधान्याला १० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी. शिवाय, शेतकऱ्यांना सन २०२३-२४ खरीप पिकाच्या पीक विम्याची रक्कम देण्यात यावी. चालू वर्षात धानाला एक हजार रूपये बोनस द्यावा, नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी द्यावी, तरीपण शुद्धा त्वरित शासनाकडून आर्थिक मदत मिळावी याकरिता तातडीने अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शासनाकडे पाठवावे अशी मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते विश्वरत्न रामटेके यांनी केली आहे.