
गोरेगाव,दि.07ः– तालुक्यात मुख्यता:धानाचे पिक घेतले जाते खरीप पिकाशिवाय दुसरे पीक या तालुक्यात अल्प प्रमाणात आहे.यावर्षी कीडीचा प्रादुर्भाव त्यामुळे धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे धान पिकाचे नुकसान झाले आहे. उर्वरक , कीटकनाशक ,मजुरीचे वाढलेले भाव धान उत्पादक शेतक-यांना परवळणारे नाही.त्यामळे शेतकरी खुप मोठ्या अडचणित आलेला आहे त्याचप्रमाणे सुशीक्षीत बेरोजगार शासनाच्या नौकर भरतीच्या ध्येयधोरणामुळे अडचणीत आलेला आहे.अशा विवीध मागण्यांना घेऊन आज ७/१२/२०२३ गुरुवारला गोरेगांव तालुका काँग्रेस कमेटीच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार के.के.भदाणे यांच्यामार्फेत सादर करण्यात आले.त्यापुर्वी आदिलोक भवन येथे काँग्रेस कमिटीची सभा घेण्यात आली.
निवेदनात १)२८नोव्हेंबरला व सध्या होत असलेल्या अवकाळी पावसामुळे धान ओले चिंब झाल्यामुळे कापनी केलेले कडपे व पुंजणे अंकुरीत झाल्याने नुकसान झाले आहे करीता त्वरीत पंचनामा करुन त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी.
२)शेतक-यांची पिक विम्याची रक्कम त्वरीत देण्यात यावी.३) गोरेगांव तालुका सरसकट दुष्काळ जाहीर करावा. ४) शेतक-यांचे पिक कर्जाची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी.५) धानाला उत्पादन खर्चाप्रमाणे ३०००/- रुपये प्रती क्विंटल शाशकीय आधारभुत हमीभाव देण्यात यावा.६) शेतक-यांचे कृषी पंपाचे विज बील माफ करण्यात यावे.७) सुशीक्षित बेरोजगारांना शाशकीय नौकरी व भरतीची कंत्राटी पध्दत बंद करुन सरळ सेवेत भरती करुन नियमीत करण्यात यावे या व्यतिरीक्त अनेक मागण्यांचा समावेश निवेदनात आहे.
निवेदन देतेवेळी गोरेगांव तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष डेमेन्द्र राहागंडाले,जिल्हा परीषद सदस्य जितेन्द्र कटरे, पंचायत समीती सदस्य ओमप्रकाश कटरे, किसान काँग्रेस अध्यक्ष चंद्रशेखर बोपचे ,तालुका महीला काँग्रेस अध्यक्ष भुमेश्वरीबाई राहागंडाले,शहर महीला काँग्रेस अध्यक्ष कविताबाई लिचळे, गोरेगांव शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष खीरचंद येळे,प्रेमेन्द्र कटरे,महेश चौधरी, कृ.ऊ बा समीती संचालक गोपाल ठाकुर,श्यामराव हरीणखेळे,राहुल कटरे ,मालीकचंद मेळे,उत्तम कटरे,किरण माणकर,रमेश राहागंडाले,दुलीचंद राहागंडाले,सुरेश चन्ने,पंकज चौव्हान,मनोहर मौजे,कलाम शेख,जितेन्द्र डोंगरे,मुरली पटले,तुलशी मेश्राम,जगदीश मेश्राम,बादल टेंभरे,विजय भोयर,सादील हुसैन,भाऊलाल नरवास,रमेश क्षीरसागर,श्यामु अंबुले,छगन सेवुतकर,हरीलाल ठाकरे,शंकर बिसेन,ओमेन्द्र पटले,सोबीलाल डोमळे,चंद्रशेखर कटरे,छोटेलाल पटले,राजेश चुलपार,रविन्द्र साखरे,चंद्रकांत बावनकर,सोमचंद पटले आदी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ता उपस्थीत होते.





