
भडारा : – साकोली तालुक्यातील उसगाव/सोनेगाव येथे लॉयन्स क्लब भंडारा व अंमलबजावणी संस्था ग्राम विकास संस्था भंडाराच्या संयुुक्त विद्यमाने १२ डिसेंबर रोजी ब्लॅकेट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी १०० गरजू एकल विधवा महिलांना व पुरुषांना ब्लॅकेट वाटप करण्यात आले तसेच ७ वी तील विद्यार्थाना नोटबुक वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले लॉयन्स क्लबचे अध्यक्ष मनोज वंजानी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन लॉयन्स क्लब भंडारा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली व सामाजिकतेची जाणीव ठेवून विविध समाज उपयोगीकार्य करण्याचा ध्यास असल्याचे सांगीतले. लॉयन्स क्लबचे सदस्य विजय दलाल यांनी क्लबचे कार्य,उपक्रम आतापर्यत सुरु असलेला प्रवास यावर प्रकाश टाकला. तसेच लॉॅयन्स क्लब भंडाराचे द्वितीय प्रांतपाल भरत भलगड यांनी ब्लॅकेट वाटप कार्यक्रमाचा उद्देश व आपल्या सहभागामुळे आम्हाला प्रेरणा मिळते आणि क्लबला समाजाचे ऋण फेडण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे सांगीतले. ग्राम विकास संस्था भंडाराचे संस्थापक दिलीप बिसेन यांनी संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रम्ची माहिती व शाश्वत ग्राम विकास प्रकल्प, गाव दत्तक योजनेवर प्रकाश टाकला, तसेच पुढील वाटचालीबाबत मत व्यक्त केले . कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन लॉयन्स क्लबचे कोषाध्यक्ष अरविद भुरे, सदस्य संदीप गुरबानी, मनोज रक्षिये, मिनल जैन, रवि चानोरे व ग्रा.पं. उसगाव चे उपसंरपच किशोर बोपचे ग्रा.पं. सदस्य धनजंय रामटेके ,जितेद्र परतेके, ग्रा.पं. सदस्या दिपा येळेकर, छाया कवरे, नलिनी मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता संदेश सय्याम उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद हातझाडे, दिलहर बन्सोड, उमेश जांगळे गुड्डू कुंभरे, कर्मविर काळसर्पे, राष्ट्रपाल नागदेवे तसेच सर्व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.





