आमगाव,दि.30– तालुक्यातील चिरचाळबांध येथील हरिहरभाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिरचाळबांध येथे दि.२९ डिसेंबर २०२३ रोज शुक्रवारला स्नेहसंमेलनचे उद्घाटन चिरचाळबांधच्या सरपंचा सौ.ललिताताई केवलभाऊ भाजीपाले यांच्या अध्यक्षतेखाली आमगाव प.स.सभापती राजेन्द्र गौतम यांच्या हस्ते पार पडले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केन्द्र प्रमुख श्री भुसारी,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक श्री खापर्डे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री मिश्रा, हुकमीचंदजी गोदेले,से.नि.प्राचार्य उल्हास तागडे,एस.यु.बागळकर, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.एन.तितीरमारे यांनी केले तर आभार स्नेहसंमेलन कार्यवाह के.जी.मडावी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.