तिरोडा:- धापेवाडा उपसा सिंचन टप्पा क्र.२ हि योजना शेतक-यांसाठी वरदान ठरली असून याअंतर्गत बोदलकसा व चोरखमारा तलावाद्वारे २९५१२ हजार हेक्टर जमिनीला सिंचन होणार आहे. तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी विधानसभा क्षेत्रात सिंचनविषयक सुविधांवर जास्तीत जास्त भर दिला असून टप्पा क्र १ व २ कार्यन्वित केले. सदर योजनेचा लाभ विधानसभा क्षेत्रातील गोंदिया व तिरोडा तालुक्यातील शेतक-यांना लाभ मिळतो याबरोबरच गोरेगाव तालुक्यातील शेतक-यांना याचा लाभ मिळावा. याकरिता टप्पा क्र.२ योजना कार्यन्वित करण्याबाबत शासनाकडे विनंती केली जलसंपदा विभागांतर्गत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार पाटबंधारे महामंडळाना सन २०१५ ला दिलेला असून त्याअनुषगाणे राज्य तांत्रिक सल्लागार समिती नाशिक मार्फत महमंडळास सादर करण्यात आले .सदर प्रकल्पाअंतर्गत बॅरेज, पंपगृह व सर्रा व बोदलकसा ऊर्ध्वनलीकेचे काम जून २०२३ अखेर पूर्ण झाले असून याद्वारे ८६५० हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली आहे. व यामध्ये प्रामुक्याने ९१७.०३ कोटी रुपये प्रशासकीय मान्यता मंजूर होते त्यापैकी ९१०.९२ कोटी खर्च झालेले आहत. सन २०२१-२२ च्या दरसूचीनुसार ५२१७.९२ कोटी रुपये आवश्यक असून सदर निधीस नियामक मंडळाकडून मान्यता देण्यात आली आहे. यामुळे धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा २ अंतर्गत बोदलकसा येथे पंपगृह बांधकाम करून त्याद्वारे गोरेगाव तालुक्यातील गुमडोह,कटंगी,पांगडी तलावात पाईपलाईनद्वारे पाणी सोडण्याच्या कामाला २०२४ मध्ये सुरुवात होणार आहे. याकरिता एकूण ४२.९१ टक्के भूसंपादन होणार असल्याची माहिती तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी दिली असून राज्याचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.